Goa Tourism at Times Square Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism at Times Square: अमेरिकेच्या सुप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर येथे गोव्याच्या पर्यटनाची झलक

Akshay Nirmale

Goa Tourism at Times Square in USA: पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी गोव्यात पर्यटनासाठी अमेरिकन नागरिकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागाने अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेयर येथे एक मोहिम राबवली.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून गोव्याची प्रतिमा आणखी बळकट करण्यासाठी ही मोहिम राबवली गेली. इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. गोव्याच्या पर्यटन विभागाने हा प्रयत्न केला. आगामी काळातही येथे गोव्याच्या पर्यटनाची मोहिम झळकणार आहे.

यापुर्वी गोवा सरकारने अमेरिकन पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ठोस पावले उचलली नव्हती. गेल्या दशकभरात पर्यटनासाठी नवनवीन बाजारपेठांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्यात फारसे यश आले नाही.

संबंधित बातमीत पर्यटन अधिकाऱ्याने म्हटले आहे की, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटन हा गोव्याच्या पर्यटनाचा युएसपी आहे. तथापि, याव्यतिरिक्त लग्न, आरोग्य, आध्यात्मिक पर्यटन, वारसास्थळे, सभा, परिषदा इत्यादीं (MICE) साठी तसेच साहसी पर्यटनाचे ठिकाण म्हणून गोव्याचे आक्रमक मार्केटिंग केले गेले.

त्यातून गोव्याची पर्यटन स्थळ म्हणून प्रतिमा अधिक मजबूत करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यात आमच्याकडे अधिकाधिक लक्ष गेले असते, हाच आमचा हेतू होता.

टाईम्स स्क्वेयर हे ठिकाण जगातील सर्वाधिक भेट दिले जाणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे दररोज 3.6 लाख लोक येतात. तर येथे एका दिवसात भेट देणाऱ्यांची सर्वाधिक संख्या 4.6 लाखांहून जास्त आहे.

सन 2018 आणि 2019 मध्ये गोव्यात अमेरिकन पर्यटकांचे प्रमाण वाढले होते. ते दोन्ही वर्षात प्रत्येकी 25,000 पेक्षा जास्त अमेरिकन प्रवासी असे होते. पण 2020 मध्ये ही संख्या 16,000 पर्यंत घसरली होती. त्या वर्षी जगाला कोरोनाने ग्रासले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT