Tarak Arolkar: म्हापसातील नगरसेवक तारक आरोलकर यांच्या अपात्रतेसह छाननी समितीचा निर्णय रद्द

उच्च न्यायालयाचा दिलासा
Tarak Arolkar | Mapusa Municipal Council
Tarak Arolkar | Mapusa Municipal CouncilGomantak Digital Team

Tarak Arolkar Disqualified: म्हापसा नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक सात मधील नगरसेवक तारक आरोलकर यांना नगरविकास खात्याने अपात्र ठरवले होते. त्यांचा जातीला दाखला रद्द झाल्याने त्यांचे पद धोक्यात आले होते.

दरम्यान, याविरोधात आरोलकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत आरोलकर यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे.

Tarak Arolkar | Mapusa Municipal Council
कुडचडे येथे हिट अँड रन! भर पावसात कारची दुचाकीला धडक, ऐनवेळी उडी मारली म्हणून...

हायकोर्टाने तारक आरोलकर यांची पालिका प्रशासनाने केलेली अपात्रता आणि छाननी समितीचा निर्णय रद्द ठरवला आहे. हायकोर्टाच्या या निर्णयाने आरोलकर यांना दिलासा मिळाला आहे.

म्हापशातील माजी नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो यांनी समाजकल्याण विभागाच्या तीन सदस्यीय छाननी समितीकडे आरोलकर यांच्या जातीच्या दाखल्याबाबत तक्रार केली होती.

समाज कल्याण विभागाच्या छाननी समितीच्या निर्देशानंतर आरोलकर यांचा जातीचा दाखला बार्देश उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांनी रद्द केला होता.

छाननी समितीने पालिकेने आरोलकर यांचे ओबीसी प्रमाणपत्र पडताळले नाही, असे म्हटले होते. त्यानंतर बार्देश उपजिल्हाधिकार्‍यांनी प्रमाणपत्र रद्द करावे, असे म्हटले होते. त्यानंतर आरोलकर यांना अपात्र ठरविण्यात आले होते.

Tarak Arolkar | Mapusa Municipal Council
गोव्यात धावत्या ट्रेनमध्ये मुलीचा विनयभंग; ठाण्यातील 'त्या' युवकाला 14 दिवसांची पोलीस कोठडी

एप्रिल 2021 मध्ये आरोलकर यांनी ओबीसी प्रमाणपत्राच्या आधारे पालिका निवडणूक लढवली होती. म्हापसा पालिकेच्या प्रभाग 7 मधून ओबीसी आरक्षित प्रभागातून ते विजयी झाले होते.

दरम्यान, एप्रिल महिन्यात बार्देश तालुक्यात कोलवाळ येथे अॅमेझॉन या ई कॉमर्स संकेतस्थळ कंपनीच्या कॉलसेंटरमधून बोलत असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक झाली होती. हे बेकायदा कॉल सेंटर नगरसेवक तारक आरोलकर यांनी भाड्याने दिलेल्या जागेत चालवले जात होते.

याप्रकरणी आरोलकर यांना अटक झाली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका देखील झाली होती. आरोलकर 2022 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँगेसचे उमेदवार होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com