Goa Tourism: गोव्यातील जगप्रसिद्ध दोना पावला जेटीच्या नुतनीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. ही जेटी 1 डिसेंबरपासून जनतेसाठी खुली होईल. दोना पावला सर्कल येथील जॅक सिक्वेरा चौक ते जेटीपर्यंत पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक बसेसची जा-ये करण्यासाठी मोफत सोय करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल दिली.
पणजीतील पर्यटन भवनमध्ये पर्यटनमंत्री रोहन खंवटे व महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात, महापौर रोहित मोन्सेरात, पर्यटन संचालक निखिल देसाई, वाहतूक पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई, पणजी वाहतूक पोलिस निरीक्षक ब्रँडन डिसा, नगरसेवक काब्राल यांच्या उपस्थितीत काल बैठक झाली.
तसेच, यावेळी दोना पावला जेटी, वाहतूक कोंडी, पार्किंग व जेटीवरील फेरीवाले या विषयांवर चर्चा होऊन काही पर्याय व सूचना करण्यात आल्या. बेशिस्त पार्किंगमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन केले जाईल. तसेच जेटीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या फेरीवाल्यांचा व्यवसाय स्थलांतर न करण्याचा ठरवण्यात आले आहे.
'सनबर्न'मध्ये फक्त गोमंतकीय कलाकार
सरकारने येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलसाठी आयोजकांना परवानगी देण्याचा निर्णय घेताना गोमंतकीयांना योग्य वेगळे व्यासपीठ या महोत्सवात उपलब्ध करण्यात येणार आहे. सनबर्न फेस्टिव्हलच्या काळात या व्यासपीठावर फक्त गोमंतकीय कलाकारांनाच त्यांच्या कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. हे प्रथमच घडत असल्याची माहिती मंत्री खंवटे यांनी दिली.
धोरणाचा विस्तार
सरकारने या शॅक चालकांना डेकबेड्सच्या शुल्कात 10 हजारावरून 25 हजार रुपये शुल्क केल्याने तसेच कचरा जमा करण्यासाठी शुल्क आकारणीस विरोध केला आहे. त्यांचा हा शुल्क संबंधीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आला आहे. हे शुल्क कमी करण्याचा निर्णय उद्यापर्यंत होईल. सरकारने हे शुल्क वाढवून फक्त पर्यटन धोरणाचा विस्तार केला आहे, असे मंत्री खंवटे म्हणाले.
बाबुश मोन्सेरात, मंत्री-
दोना पावला जेटी, पणजीतील पर्यटन सुविधा वाढवण्याबाबत तसेच इतर समस्या यासंदर्भात आज पर्यटनमंत्र्यांबरोबर चर्चा करण्यात आली. जेटीचे काम पूर्ण झाले आहे व १ डिसेंबरला पर्यटकांसाठी खुली करण्यात येईल. वाहतूक कोंडीबाबतही खंडपीठाच्या निर्देशांची अंमलबजावणी केली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.