पणजी: पर्यटनाच्या अधिक समन्वित आणि शाश्वत विकासासाठी विविध खात्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. पर्यटन विभाग आणि वन विभाग जर एकत्र आले, तर आपण पर्यावरणपूरक आणि उच्च दर्जाचे पर्यटन अनुभव तयार करू शकतो. ही भागीदारी गोव्याच्या निसर्ग आधारित पर्यटनाला नवीन दिशा देईल आणि स्थानिकांना तसेच पर्यटकांना लाभदायक ठरेल, असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
गोव्याचे पर्यटन केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरते मर्यादित न राहता, राज्यातील अंतर्गत निसर्गसंपदा, धबधबे, वनक्षेत्र आणि साहसी पर्यटनाच्या संधींना चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गोवा पर्यटन संचालनालय आणि गोवा वन विकास महामंडळ यांच्यात यासंदर्भात विशेष बैठक झाली.
या बैठकीत पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन विभागाचे संचालक केदार नाईक, जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप अरोलकर, वन विकास महामंडळ अध्यक्षा डॉ. दिव्या राणे, व्यवस्थापकीय संचालक नंदकुमार परब, महाव्यवस्थापक अमर हेबळेकर आणि पर्यटन मंत्र्यांचे ओएसडी शॉन मेंडेस उपस्थित होते.
गोव्याची खरी समृद्धी ही अंतर्भागात आहे. आपल्याला आता किनाऱ्यांवरून लक्ष हटवून या गोष्टींच्या संवर्धन आणि पर्यटन विकासावर भर द्यायला हवा. गोव्याचे पर्यटन आता अधिक समावेशक, पुनरुत्पादक आणि भविष्याभिमुख बनवण्याची ही संधी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.