Dr. Deviya Rane Dainik Gomantak
गोवा

Dr. Deviya Rane : सुर्ला गावाला दिव्या राणे यांची भेट

पर्यटन विकासाला चालना; अधिकाऱ्यांमार्फत परिसराची पाहणी

दैनिक गोमन्तक

वाळपई : गोव्याचे माथेरान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुर्ला - सत्तरी गावाला पर्यटनदृष्ट्या चालना मिळणार आहे. सुर्ला भागातील सडा या ठिकाणी विकास करण्यासंबंधी हालचालींना सुरवात झाली असून नुकतीच गोवा वन विकास महामंडळाच्या चेअरमन व आमदार डॉ. दिव्या राणे यांनी या भागाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व प्राथमिक स्वरूपाच्या कागदोपत्री सोपस्कार करायला सुरवात करण्याचे निर्देश दिले.

(goa tourism Divya Ranes visit to Surla village)

पर्यटनदृष्ट्या विकास केल्यास या भागाला विकासाची गती प्राप्त होणार आहे‌. यासंदर्भाचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. स्थानिक आमदार डॉ. दिव्या राणे यांनी गोवा वन विकास महामंडळ चेअरमनपदाचा ताबा घेतल्यानंतर आपली पहिली पसंती सुर्ला भागाला असेल अशाप्रकारची घोषणा केली होती.

सुर्ला गाव गोवा कर्नाटक सीमेवर असून कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक या भागांमध्ये भेट देत असतात. तेथे हवामान थंडगार असल्याने पर्यटन क्षेत्र म्हणून हा परिसर नावारूपास येऊ शकतो.

कुटिरांसाठीचा आराखडा तयार

या भागात पर्यटन कुटिरांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे‌. यासंदर्भातची पाहणी आमदार डॉ. दिव्या राणे यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. सडा भाग हा म्हादई अभयारण्याच्या अखत्यारित येत आहे. यामुळे या ठिकाणी अभयारण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करून पर्यटन विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC Fine Team India: रोहित, विराटसह सर्वच खेळाडूंना धक्का! 'आयसीसी'ने ठोठावला दंड; एकदिवसीय मालिकेतील 'ती' चूक पडली भारी

Crime News: थंडीत मरण्यासाठी उंच पर्वतावर सोडलं, फोन सायलेंट केला, ब्लँकेटही दिलं नाही; गिर्यारोहक बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला मारलं? काय नेमकं प्रकरण?

Indigo Flights: मोपा विमानतळावर 8 तर दाबोळीत 9 विमाने रद्द; इंडिगोच्या गोंधळामुळे मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांचे प्रवास ठप्प

Goa Nightclub Fire: नाईट क्लब दुर्घटना प्रकरणात 'पाचवी' अटक, भरत कोहलीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मालकाचा शोध सुरु

रो दे, रो दे... विराट कोहलीने कुलदीप यादवची उडवली खिल्ली, ड्रेसिंग रूममधील Video Viral

SCROLL FOR NEXT