खलाशांनी पोहून गाठला किनारा, मिरामार समुद्रात ट्रॉलर बुडाला

समुद्रातून मासे पकडून मालिम जेटीकडे येणारा ट्रॉलर शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मिरामार परिसरात समुद्रात बुडाला.
Sailors swam to shore, trawler sank in Miramar sea
Sailors swam to shore, trawler sank in Miramar seaSandip Desai

पणजी : समुद्रातून मासे पकडून मालिम जेटीकडे येणारा ट्रॉलर शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मिरामार परिसरात समुद्रात बुडाला. ट्रॉलर एका बाजूला झुकतोय असे कळताच खलाशांनी व त्यावरील कामगारांनी समुद्रात उड्या घेऊन पोहत किनारा गाठला.

ट्रॉलर बुडत असल्याची बाब लक्षात येताच करंजाळे येथील काहीजण बोट घेऊन खलाशांना वाचविण्यासाठी धावले. या ट्रॉलरवर 31 खलाशी होते. सर्वजण सुखरूप असले तरी ट्रॉलरला जलसमाधी मिळाली.

Sailors swam to shore, trawler sank in Miramar sea
Land Grabbing Case : तपासाची सुई राजकीय नेत्यांकडे

मिळालेल्या माहितीनुसार, खोल समुद्रातून मासळी घेऊन मालिम जेटीकडे सकाळी ट्रॉलर येत होता. साडेअकराच्या सुमारास मिरामार परिसरात हा ट्रॉलर एका बाजूला कलू लागला. ट्रॉलर बुडण्याची स्थिती दिसतेय असे ओळखून प्रसंगावधानाने खलाशांनी समुद्रात उड्या घेत पोहत समुद्र किनारा गाठण्यास सुरवात केली. करंजाळे परिसरातील काही मच्छिमारांना ट्रॉलर बुडतोय असे दिसताच, ते बोट घेऊन मदतीला धावले. त्यांनी पोहणाऱ्या खलाशांना पाण्याबाहेर काढले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com