Goa Tourism Development Corporation’s seaplane service will  take more time for launch
Goa Tourism Development Corporation’s seaplane service will take more time for launch  Dainik Gomantak
गोवा

गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या 'सी प्लेन' सेवेला विलंबच

दैनिक गोमन्तक

गोवा पर्यटनाची (Goa Tourism) सीप्लेन (Sea Plane) सेवा सुरू करण्याची योजना प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याने हा विलंब होणार असल्याचे कळत आहे.

"गोव्यातील सीप्लेन सेवेची ओळख, संचालन आणि व्यवस्थापन" यासाठी पुन्हा निविदा काढल्यानंतर, जुलैमध्ये एअर मौर्यन सर्व्हिसेस लिमिटेड सर्व्हिसेसची निवड करण्यात आली होती. अधिकाऱ्याच्या विनंतीवरून ही मुदतवाढ देण्यात आली आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ (GTDC) च्या शेवटच्या बोर्ड बैठकीत याबाबत अधिकृत निर्णय घेण्यात आला होता. (Goa Tourism Development Corporation’s seaplane service will take more time for launch)

या प्रकल्पासाठी यशस्वी बोली लावणाऱ्या कंपनीला याबद्दल परवानगी मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आत काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे . सेवा प्रदात्यासाठी विविध प्राधिकरणांकडून परवानग्या मिळवणे हे एक आव्हानात्मक कार्य आहे हे लक्षात घेऊन, सेवा प्रदात्याची विनंती मान्य करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. GTDC ने सुमारे पाच वर्षांपूर्वी सी प्लेन सेवा सुरू करण्याची कल्पना मांडली होती, जेव्हा त्यांनी राज्याच्या पर्यटनाची क्षमता वाढवण्यासाठी राज्यात अनेक नवीन पर्यटन सेवा सुरू केल्या होत्या.

2015 मध्ये, सरकारने सागरी विमान सेवा सुरू करण्यासाठी मेरीटाइम एनर्जी हेली सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (MEHAIR) सह सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.त्यानंतर या प्रकल्पासाठी मार्ग देखील निश्चित करण्यात आले होते. त्यांनतर लागेचच पुढील हंगामात ही सेवा सुरू होणार होती, परंतु सेवा प्रदात्याच्या काही अंतर्गत समस्या असल्याने GTDC ची योजना विस्कळीत झाली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, जर सर्व काही ठीक झाले तर किमान पुढील हंगामात या सेवा सुरू करण्याचा त्यांना विश्वास आहे. 'आमची सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे काही विशिष्ट लोक आणि कार्यकर्त्यांनी याबाबत अवास्तव आक्षेप घेतला आहे, जिथे पर्यावरणीय प्रदूषणाचा प्रश्न उद्भवत नाही. जर आम्ही सी प्लेन सेवा सुरू करण्यात यशस्वी झालो, तर दर्जेदार पर्यटकांचे लक्ष वेधण्यासाठी ते एक उत्तम प्लस असेल,” असेही त्यांनी सांगितले आहे. अधिका-याने सांगितले की, किमान आत्तापर्यंत, त्यांना सीप्लेन सेवा असण्याच्या त्यांच्या योजनेला कोणताही गंभीर विरोध झालेला नाही, परंतु तरीही ते सावध आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT