Dona Paula Jetty: Dainik Gomantak
गोवा

Dona Paula Jetty: जुन्या दोना पावला जेट्टीची GTDC करणार पुनर्बांधणी अन् दुरूस्ती; 7.5 कोटी रूपये खर्च

14 डिसेंबर रोजी उघडणार निविदा

Akshay Nirmale

Old Dona Paula Jetty: गोव्याची राजधानी पणजीतील एक सुप्रसिद्ध पर्यटन केंद्र असलेल्या दोना पावला येथील जुन्या जेट्टीचा सुमारे 49 मीटरचा भाग जीर्ण झाला आहे.

त्यामुळेच तो पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. तर नूतनीकरण केलेल्या जेटीचा मोठा भाग पर्यटक आणि स्थानिकांसाठी सध्या खुला आहे.

दोना पावला जेटीच्या नुतणीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर गोवा पर्यटन विकास महामंडळाने (GTDC) जुन्या जेटीची संरचनात्मक दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी अंदाजे 7.5 कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच एक वर्षात हे काम पूर्ण करण्याची योजना आहे.

या कामासाठी कंत्राटदार निवडण्यासाठी GTDC ने निविदा काढली आहे आणि 14 डिसेंबर रोजी निविदा उघडण्यात येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) जुन्या जेट्टीचा भाग धोकादायक असल्याचा इशारा दिल्यानंतर या ओल्ड जेट्टीचा सुमारे 49 मीटरचा भाग पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. PWD ने अहवालात ओल्ड जेटीची पुनर्बांधणी करावी, असे सुचवले होते.

GTDC ने वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून Darashaw & Co ची नियुक्ती केली आहे. फर्म रेखाचित्रांचा पुरवठा करेल आणि प्रकल्पाच्या अभियांत्रिकी आणि अंमलबजावणीवर देखरेख करेल.

जेट्टीचे रेलिंग अनेक ठिकाणी तुटलेले किंवा गायब असून ते गंजले असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. इलेक्ट्रिकल फिक्स्चरची दुरवस्था झाली आहे आणि यातील सळ्या उघड्या पडल्या असून गंजलेल्या आहेत.

या सर्वांमुळे जेट्टी स्थानिकांसह पर्यटकांसाठी धोकादायक बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात खळबळ! नावेलीमधून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण, मडगाव पोलिसांकडून तातडीने शोध सुरु

IFFI 2025 Opening Ceremony: 56व्या इफ्फीची दणक्यात सुरुवात, गोव्याच्या चित्ररथांची मिरवणूक ठरली सांस्कृतिक आणि कलात्मक पर्वणी VIDEO

Delhi Blast Case: दिल्ली स्फोट प्रकरणी 'एनआयए'ची मोठी कारवाई! चार मुख्य आरोपींना अटक; 2900 किलो स्फोटकांचा साठा जप्त

IFFI 2025: गोवा बनलं जागतिक सिनेमाचं घर, 56व्या 'IFFI'चं थाटात उद्घाटन; CM सावंतांनी सिनेप्रेमींना दिला 'येवकार'

Viral Video: कोरियन महिला खासदारानं गायलं 'वंदे मातरम', फिल्म बाजारमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT