Goa Yachting Dainik Gomantak
गोवा

Goa Yachting: बेकायदा यॉटिंगवर होणार कारवाई, पंधरा दिवसांत नोंदणी करण्याचा पर्यटन खात्याचा आदेश

Goa Yachting Registration Deadline: गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने सर्व यॉटिंग सेवा पुरवठादारांना गोवा पर्यटन व्यापार नोंदणी अधिनियम १९८२ आणि नियमावली १९८५ अंतर्गत आवश्यक परवानग्या घेण्याचे सक्त आदेश दिले आहेत.

Manish Jadhav

पणजी: गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने सर्व यॉटिंग सेवा पुरवठादारांना गोवा पर्यटन व्यापार नोंदणी अधिनियम 1982 आणि नियमावली 1985 अंतर्गत आवश्यक परवानग्या घेण्याचे सक्त आदेश दिले आहेत.

पुढील 15 दिवसांत नोंदणी अनिवार्य

दरम्यान, पर्यटन विभागाच्या अधिकृत परिपत्रकानुसार यॉटिंग सेवा पुरवणाऱ्या सर्व व्यावसायिकांनी पुढील 15 दिवसांच्या आत आपली नोंदणी पूर्ण करणे बंधनकारक आहे. यामागचा उद्देश यॉटिंग सेवा नियंत्रित करणे, पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि कायदेशीर अटींचे पालन सुनिश्‍चित करणे हा आहे.

बेकायदेशीर सेवा पर्यटकांसाठी जीवघेणी ठरु शकते

पर्यटन संचालक केदार नाईक यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, राज्यातील जलक्रीडा सेवा अधिक पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोणतीही बेकायदेशीर सेवा ही पर्यटकांच्या (Tourists) सुरक्षिततेसाठी तसेच पर्यावरणासाठी धोकादायक ठरु शकते. त्यामुळे सर्व संबंधित व्यावसायिकांनी पुढे येऊन आवश्यक ती नोंदणी करुन आपली सेवा अधिकृत करावी, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ganeshotsav: गोव्यात 77 हजार गणेशमूर्तींची नोंद; तब्बल 22,886 मूर्तींमध्ये 'POP', पर्यावरण खात्याच्या पोर्टलवरील आकडेवारी समोर

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

SCROLL FOR NEXT