Goa First Super Yacht: आता गोव्यात घेता येणार 'लक्झरी' पर्यटनाचा आनंद, पहिल्या सुपर यॉटचे लोकार्पण Video

RA11 Super Yacht: नव्याने लॉन्च केलेली यॉट राज्याच्या पर्यटनासाठी आवश्यक होती, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
Goa First Super Yacht: आता गोव्यात घेता येणार 'लक्झरी' पर्यटनाचा आनंद, पहिल्या सुपर यॉटचे लोकार्पण Video
RA11 super yachtGoa CM X Handle
Published on
Updated on

Goa First RA 11 Super Yacht

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या सुपर यॉट ‘RA11’ चे उद्घाटन पार पडले. नव्या यॉटचे उद्घाटन ‘मेक इन इंडिया, मेक इन गोवा’ उपक्रमातील मैलाचा दगड ठरले आहे.

भारताच्या प्रमुख सागरी क्लस्टरचा एक भाग म्हणून विकसित, ‘RA11’ लाँच केल्याने गोव्याच्या पर्यटनात, विशेषत: लक्झरी आणि नॉटिकल पर्यटन क्षेत्रात वाढ होण्याची अपेक्षा आहे. कॅप्टन ऑफ पोर्ट्स जेट्टी येथे बुधवारी (०६ नोव्हेंबर) हा कार्यक्रम पार पडला.

गोवा MSME विजय मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारे तयार केलेल्या RA 11 सुपर यॉटचे उद्घाटन केले, हे भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे जहाज आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणारी यॉट मेक इन इंडिया, मेक इन गोवा या संकल्पनेला मूर्त रूप देते.

RA 11 चे उद्घाटन गोव्यासाठी मैलाचा दगड आहे. यॉट टूरिझमद्वारे पर्यटनाचा विस्तार करण्याच्या प्रवासाला सुरुवात होत आहे. हे नवीन क्षेत्र उच्च श्रेणीतील पर्यटकांना आकर्षित करेल, ज्यामुळे राज्याच्या पर्यटन उद्योगाला मोठा फायदा होईल आणि आर्थिक वाढीसाठी नवीन मार्ग खुले होतील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.

Goa First Super Yacht: आता गोव्यात घेता येणार 'लक्झरी' पर्यटनाचा आनंद, पहिल्या सुपर यॉटचे लोकार्पण Video
Goa Tourism Stats Row: गोवा सरकारच्या तक्रारीनंतर रामानुजन मुखर्जी यांची संतप्त प्रतिक्रिया; "हा तर..."

यॉटमध्ये काय खास आहे? What's Special in RA11 Super Yacht

'RA11' लक्झरी पर्यटन आणि कार्यक्रमांसाठी डिझाइन केलेली आलिशान यॉट आहे.

यॉटमध्ये प्रशस्त लाउंज, निवांत आणि प्रसन्न जेवणाचे क्षेत्र आणि विस्तीर्ण बाहेरील डेक, गोव्याच्या किनारपट्टीच्या सौंदर्याचा आनंद घेताना विवाहसोहळा, खाजगी मेळाव्यासाठी किंवा आरामात राहण्यासाठी RA11 यॉट एक आदर्श पर्याय ठरणार आहे.

पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी राज्य सरकार नाविन्यपूर्ण गोष्टी राबविण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याच्या पर्यटनाला बढावा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नव्याने लॉन्च केलेली यॉट राज्याच्या पर्यटनासाठी आवश्यक होती, असेही मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com