Goa Tourism Department pavilion tops GITB 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: 'गोवा पर्यटन' अव्वल! GITB जयपूर मध्ये प्रभावी सादरीकरण; दालन ठरले सर्वोत्कृष्ट

Great Indian Travel Bazaar Jaipur: राजस्थान सरकार, पर्यटन मंत्रालय आणि FICCI यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या महत्त्वाच्या पर्यटन महोत्सवात गोवा विभागाला थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.

Sameer Panditrao

पणजी: जयपूर येथे आयोजित ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बाजार (जीआयटीबी) २०२५ मध्ये गोवा पर्यटन खात्याने प्रभावी सहभाग नोंदवत, राज्यातील पुनरुत्पादक आणि शाश्वत पर्यटन संकल्पनांचे यशस्वी सादरीकरण केले. राजस्थान सरकार, पर्यटन मंत्रालय आणि एफआयसीसीआय यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या महत्त्वाच्या पर्यटन महोत्सवात गोवा पर्यटन विभागाला आंतरराष्ट्रीय खरेदीदार, टूर ऑपरेटर आणि प्रमुख पर्यटन उद्योगधारकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.

पर्यटन सचिव संजीव आहुजा यांच्या नेतृत्वाखालील गोवा शिष्टमंडळात पर्यटन संचालक केदार नाईक, जीटीडीसीचे महाव्यवस्थापक गेविन डायस आणि उपसंचालक राजेश काळे यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने उच्चस्तरीय बी२बी बैठका, धोरणात्मक सत्रे व नेटवर्किंग संवादांत सक्रिय सहभाग घेतला. ‘

कॅटॅलिझिंग ग्रोथ

हाव टुरिझम पॉलिसीज आर अट्रॅक्टिंग एमआयसीई ऑपर्च्युनिटीज’ या चर्चासत्रात संजीव आहुजा यांनी गोव्यात सुरू असलेल्या धोरणात्मक घडामोडी, सुविधा विकास आणि भविष्यातील योजनांची सविस्तर माहिती दिली. संचालक केदार नाईक म्हणाले की, गोव्याचे सादरीकरण हे राज्याच्या विविध पर्यटन संधींचे, विशेषतः समुद्रकिनाऱ्याच्या पलिकडील गोव्याचे दर्शन घडवणारे होते.

गोवा दालन ठरले अव्वल

जीआयटीबी २०२५ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट दालनासाठी गोवा पर्यटनाला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला. पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, आम्ही पारंपारिकतेच्या पलीकडे जाणारे अनुभव प्रदर्शित करत आहोत. जीआयटीबी सारखे कार्यक्रम आम्हाला अशा भागीदारांशी जोडण्यास मदत करतात, जे या दृष्टिकोनाचे अनुकरण करतात आणि गोव्याच्या विकसित कथेचा भाग बनण्यास उत्सुक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

SCROLL FOR NEXT