Goa Illegal Hotels
Goa Illegal Hotels Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Hotels : गोव्यातील बेकायदा हॉटेल्सना झटका! आठवड्याला 40 तर एकूण 800 जणांना नोटीसा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Illegal Hotels : पर्यटन खात्याकडे नोंदणी न करता, बेकायदेशीरपणे हॉटेल व्यवसाय चालवणाऱ्या व्यवसायीकांवर गोवा पर्यटन खात्याचे (Goa Tourism Dept) कारवाईचे सत्र सुरुच आहे.

नोंदणी न करणाऱ्या जवळपास 800 हॉटेल्सना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना दंडही ठोठावण्यात आला आहे. याबाबतची माहिती पर्यटन खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी दिली.

"पर्यटन क्षेत्रातील बेकायदेशीर कामे रोखण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. शनिवार आणि रविवारी या बेकायदेशीर कामांवर आम्ही छापे टाकण्याचे काम करतो."

"नोंदणी न करणाऱ्या हॉटेल्सना जवळपास 800 नोटिसा पाठवल्या आहेत तसेच त्यांना दंडही ठोठावण्यात आला आहे. जवळपास 400 प्रकरणे सुरू आहेत. बेकायदेशीर हॉटेल्सना साप्ताहिक 30 नोटिसा पाठवल्या जात आहेत" अशी माहिती देसाई यांनी दिली.

पर्यटन खात्याने नोव्हेंबर महिन्यात नोंदणी न करणाऱ्या अकरा हॉटेल व्यवसायीकांना नोटीस पाठवली होती.  नोटीस बजावण्यात आलेल्या अकरा हॉटेलमध्ये वेल्हा, पणजी, कांदोळी, तिसवाडी, कळंगुट येथील हॉटेलांचा समावेश होता.

हॉटेल व्यवसायिकांना एक लाख रूपयांपर्यंत दंड तसेच पाणी आणि वीज जोडणी देखील बंद केली जाणार असल्याची माहिती समोर आली होती. 

राज्‍यात बेकायदा हॉटेल्‍सचा सुळसुळाट वाढल्‍याने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यटन खात्‍याने राज्‍यातील सर्व पर्यटनपूरक उद्योगांची खात्‍याकडे नोंदणी करणे सक्‍तीचे केले आहे. तरीही किनारी भागातील घरांमध्ये, निवासी परिसरात बेकायदेशीरपणे लॉजिंगचा व्‍यवसाय केला जातो.

बेकायदा हॉटेल्‍स, लॉजिंग चालकांवर कारवाई करण्यात यावी यासाठी काही महिन्यांपूर्वी गोवा नोंदणी पर्यटन व्यापार कायद्यात सुधारणा करण्यात आली. नवीन कायद्यात संबंधित निवासस्‍थान सील करण्याची तरतूद करण्यात आली असून त्यांचा पाणी आणि वीजपुरवठाही खंडित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

Goa Election 2024 Voting Live: राज्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

China Crime: धक्कादायक! चीनमध्ये माथेफिरुने केलेल्या चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू; तर 23 जण जखमी

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Israel Hamas War: रफाह शहराच्या सीमेजवळ इस्त्रायलची मोठी तयारी; ‘हा’ मुस्लिम मित्र देश संतापला; नेतन्याहू यांना दिला इशारा

SCROLL FOR NEXT