Goa Carnival 2025 Dainik Gomantak
गोवा

"Viva Carnival" Song : रंग, संगीत आणि जल्लोष! 'व्हिवा कार्निव्हल' या गाण्याने गोव्यात उसळली आनंदाची लाट

Carnival Official Song: गोव्यात कार्निव्हलची मजा रंगात असतानाच "व्हिवा कार्निव्हल" हे अधिकृत कार्निव्हल गाणे नुकतेच लाँच करण्यात आले आहे

Akshata Chhatre

Goa Carnival 2025 Official Song out

पणजी: कार्निव्हल २०२५ साठी आता केवळ एक दिवस बाकी राहील असून गोव्यातील कार्निव्हलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गोव्यात कार्निव्हलची मजा रंगात असतानाच "व्हिवा कार्निव्हल" हे अधिकृत कार्निव्हल गाणे नुकतेच लाँच करण्यात आले आहे. शाईन ऑन बँडने संगीतबद्ध केलेले हे गाणे सामूहिक एकता आणि उत्सवाचा संदेश देतंय. आयोजकांनी यंदाचा कार्निव्हल आधीपेक्षा मोठा, अधिक चमकदार आणि अधिक आकर्षक असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

पर्यटन विभागाकडून दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्निव्हलचे आकर्षण म्हणजेच किंग मोमो, क्लीव्हन मॅथ्यू फर्नांडिस, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) प्रमुख अधिकारी, यांच्या उपस्थितीत हे गाणे लाँच करण्यात आले. यानंतर आता पणजीतील नवीन पाटो पुलापासून कॅम्पल मैदानापर्यंत कार्निव्हलची भव्य मिरवणूक निघणार आहे. खरं तर पर्वरीमधून यंदा कार्निव्हलची सुरुवात होणार होती मात्र सध्या सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे यंदा पर्वरीत कार्निव्हलची फेरी भरणार नाही.पर्वरी वगळले तरीही कार्निव्हलचा उत्साह इतर प्रमुख ठिकाणीही दिसून येईल.

व्हिवा कार्निव्हलच्या गाणे लाँच करताना किंग मोमो यांनी एकता आणि शांततेवर भर देत, "यंदाचा कार्निव्हल अविस्मरणीय बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे," असे आवाहन केले आहे.

पर्यटन संचालक केदार नाईक यांनी या कार्यक्रमाबद्दल उत्साह व्यक्त करताना, "गोव्याचा कार्निव्हल आपली समृद्ध परंपरा आणि एकतेचे प्रतीक आहे" असे सांगितले. यासोबतच त्यांनी जबाबदार पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित केले, ज्यामुळे हा उत्सव स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी देखील आनंददायक ठरेल असे ते म्हणालेत.

कार्निव्हल आयोजकांनी गोव्यातील सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनाला प्राधान्य दिले आहे, गोवा पोलीस आणि आपत्कालीन सेवांच्या सहकार्याने एक व्यापक योजना लागू केली आहे. कार्निव्हलच्या दरम्यात राज्यात तसेच कार्निव्हलच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापन काळजीपूर्वक केले जाईल. दरम्यान उपस्थित लोकांना सुरळीत अनुभवासाठी अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एमजी रोडवरील बांधकाम प्रकल्पाच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी २६ फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे मिरवणुकीचा मार्ग भव्य मिरवणुकीसाठी तयार होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT