Vijai Sardesai About Taxi Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: टॅक्‍सीवाल्‍यांनी पर्यटकांकडून जास्‍त भाडे आकारू नये, सरदेसाईंची सूचना; अ‍ॅग्रीगेटर मसुद्याबद्दल शिष्टमंडळाशी चर्चा

Vijai Sardesai: गोव्याच्या पारंपरिक टॅक्सी ऑपरेटर्सच्या एका शिष्टमंडळाने आज विजय सरदेसाई यांची त्‍यांच्‍या फातोर्डा कार्यालयात भेट घेतली.

Sameer Panditrao

मडगाव: गोव्‍यातील पर्यटन व्‍यवसायाचा स्‍थानिक टॅक्‍सीचालकांना फायदा मिळण्‍याची नितांत गरज आहे, पण असे होताना टॅक्‍सीवाल्‍यांनीही पर्यटकांकडून जास्‍त भाडे आकारता कामा नये, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केली. यासाठी गोवा सरकारने स्‍थानिक टॅक्‍सीवाल्‍यांशी बोलणी करून सुवर्णमध्‍य काढण्‍याची गरज त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

गोव्याच्या पारंपरिक टॅक्सी ऑपरेटर्सच्या एका शिष्टमंडळाने आज विजय सरदेसाई यांची त्‍यांच्‍या फातोर्डा कार्यालयात भेट घेतली. गोव्‍यातील टॅक्‍सी व्‍यवसायासंदर्भात २० मे रोजी जारी झालेल्‍या अधिकृत राजपत्रात अधिसूचित केलेल्‍या गोवा ट्रान्स्पोर्ट ॲप अ‍ॅग्रीगेटर मसुद्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली.

टॅक्‍सीचालकांचे म्‍हणणे ऐकून घेतल्यानंतर सरदेसाई यांनी या व्‍यवसायातील प्रमुख भागधारकांशी सल्लामसलत न करता ही मार्गदर्शक तत्त्वे ज्या पद्धतीने लागू करण्यात आली, त्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.

यापूर्वी टॅक्‍सीचालकांसंदर्भात धोरण ठरविताना टॅक्‍सीचालकांशी चर्चा करूनच ते ठरविले जाईल असे आश्वासन आपल्‍याला विधानसभेच्‍या अधिवेशनात दिले गेले होते. टॅक्‍सीचालकांशी चर्चा न करता ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करणे म्‍हणजे सभागृहात दिलेल्‍या आश्वासनांचे उल्‍लंघन करणे, असे ते म्‍हणाले.

गोव्यात अ‍ॅग्रीगेटर्सच्या अनियंत्रित प्रवेशावर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करून आमदार विजय सरदेसाई म्हणाले, की गोव्‍यात किती कॅब अ‍ॅग्रीगेटर्सना परवानगी दिली जाईल याबद्दल कोणतीही स्पष्टता या धोरणात नाही.

या धाेरणामुळे संपूर्ण भारतातील टॅक्‍सी ऑपरेटर्स आता गोव्यात प्रवेश करू शकतील. आम्हाला पर्यटनाचे हे मॉडेल हवे आहे का? स्‍थानिकांना उपरे करून बाहेरच्‍या ऑपरेटर्सना गोव्‍यातील पर्यटनाची दारे उघडून देणे योग्‍य ठरणार नाही, असे त्‍यांनी सांगितले.

वाहतूक संबंधित सुधारणा राबविण्यात सरकारला वारंवार आलेल्‍या अपयशावर टीका करताना, सरदेसाई म्हणाले, ‘सरकारने यापूर्वी मीटर, स्पीड गव्हर्नर, जीपीएस ट्रॅकिंग उपकरणे आणली, पण ती सर्व अपयशी ठरली. फक्त या उपकरणांचे पुरवठादार आणि काही मंत्र्यांनाच फायदा झाला. ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्‍याचा उद्देश मंत्र्यांना आणि पुरवठादारांना फायदा व्हावा असा आहे का?’

‘टॅक्‍सीवाल्‍यांनी पर्यटकांकडून जास्‍त भाडे आकारू नये’

गोव्‍यात जो पर्यटन व्‍यवसाय चालू आहे त्‍याचा फायदा स्‍थानिकांना झाला पाहिजे. मात्र, असे करताना पर्यटकांवर अतिरिक्‍त बोजा पडताही कामा नये. टॅक्‍सीवाल्‍यांनी पर्यटकांकडून जास्‍त भाडे आकारू नये, अशी सूचना विजय सरदेसाई यांनी केली.

‘पर्यटन धोरण सुनिश्चितीसाठी प्रयत्न करणार’

गोवा फॉरवर्ड पार्टी या प्रकाशित मार्गदर्शक तत्त्वांचा तपशीलवार अभ्यास करेल आणि गोव्याच्या टॅक्‍सीचालकांच्‍या उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी आणि जबाबदार पर्यटन धोरण सुनिश्चित करण्यासाठी आवश्‍‍यक असलेल्‍या सूचना आणि हरकती गोवा सरकारसमाेर सादर करेल, असे आश्वासन सरदेसाई यांनी या शिष्‍टमंडळाला दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT