Goa Tourism |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: 'किनाऱ्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करणार'- भिकाजी नाईक

Goa Tourism: ग्रामस्थांकडून विविध विषयांवर चर्चा

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: अतिक्रमणामुळे किनारी भागात पर्यटकांना चालत जाणे कठीण बनले आहे. शॅक्स ते समुद्राचे पाणी यामधल्या खुल्या जागेत काही व्यावसायिक सन बेडस, टेबल, खुर्च्या अस्ताव्यस्त मांडून अतिक्रमण करतात.

पर्यटन खात्याच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होते, याकडे ग्रामसभेत ग्रामस्थांनी लक्ष वेधले. या गंभीर प्रश्नांची दखल घेऊन उद्या पाहणी व कारवाई करू,अशी ग्वाही सरपंच भिकाजी नाईक व सचिव फ्रान्सिस फेर्नांडिस यांनी ग्रामसभेत दिली.

हरमलचे सरपंच भिकाजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा घेण्यात आली. किनारी भागात शॅक्स व सन बेडस, टेबल्सच्या अतिक्रमणामुळे चालणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली.

दोन महिन्यांपूर्वी ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याने पंचायती कडून दाखला न मिळाल्याने एक दिवस मृतदेह ठेवावा लागला.त्यामुळे पंचायत सरपंच नाईक यांनी कारकून सुट्टीवर असल्याने दाखला दिला नाही, असे सांगितले.

ग्रामस्थ टोनी डिमेलो यांनी या कर्मचाऱ्याला मेमो देण्याचा आग्रह धरला व मात्र माजी सरपंच इनासियो डिसौझा यांनी पुन्हा असे प्रकार होऊ नये, असे सांगून प्रश्न आटोपता घेतला.

मार्च मध्ये झालेल्या ग्रामसभेतील दोन प्रश्नांवरील चर्चा व ठराव इतिवृत्तात नसल्याने टोनी डिमेलो व विनायक मेथर यांनी जाब विचारून सभा रोखून धरली. ग्रामस्थांच्या रेट्यामुळे दोन्ही विषय ग्रामसभेत दाखल करून घेण्यात आले.

मधलावाडा भागातील बहूचर्चित हॉटेल प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याआधी राबता दाखला मागील पंचायत मंडळाने ग्रामसभेला विश्वासात न घेता दिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

विविध समित्यांची निवड

यावेळी रस्ता सुरक्षा व दक्षता समिती, ग्राम विकास समिती, अन्न आणि स्वच्छता समिती, कचरा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली.या समितीला अधिकार नसल्याने ग्रामस्थांनी अनुत्साह दाखवला. उपसरपंच दिव्या गडेकर, पंच अनुपमा मयेकर, सोनाली माज्जी, सांतान फेर्नांडिस, सुशांत गावडे, गुणाजी ठाकूर, रजनी इब्राह्मपुरकर व गटविकास खात्याचे संतोष नाईक उपस्थित होते.

‘मोपा’ ला बांदोडकरांचे नाव द्यावे

मोपा विमानतळ प्रकल्पाला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव देण्याचा ठराव महेश वायगंणकर यानी मांडला व सर्वानुमते संमत केला. चर्चेत संजय नाईक, रुपेश नाईक, चंद्रहास दाभोलकर, मारसेलिन फेर्नांडिस, बाबो माज्जी, विनायक मेथर, स्वरूप नाईक, लावरीयन फेर्नांडिस, संतोष कोरकणकर, भाऊ गडेकर आदींनी भाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT