Goa Accident Dainik Gomantak
गोवा

कोने, प्रियोळ येथे भीषण अपघातात एक ठार; दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी 4 अपघात, गोव्यातील ठळक बातम्या

Goa Today Breaking News Live Updates: सेंट फ्रान्सिस झेवियर DNA चाचणी वाद, मुख्यमंत्री सावंत आणि मंत्री राणे धुसफूस, नवरात्रोत्सव, पर्यटन हंगाम यासह राज्यात विविध क्षेत्रात घडणाऱ्या ठळक बातम्या.

Pramod Yadav

दिवाळी आधी 'या' कंदब कंडक्टरांना कायमस्वरुपी नोकऱ्या : तुयेकर

कदंबात पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या ६५ पैकी १५ कंडक्टरांना कायमस्वरुपी करण्यात आले आहे. तसेच उर्वरित ५० कंडक्टरांना दिवाळीच्या आधी १०० टक्के कायम करण्यात येईल. कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांचे आश्वासन.

वेलिंगकरांविरोधात मडगाव पोलिस स्थानकावर निर्देशने!

सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची डीएनए चाचणी संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानासाठी वेलिंगकर यांना त्वरित अटक करण्याची मागणी करत, स्थानिकांकडून मडगाव पोलिस स्थानका बाहेर निर्देशने. पोलिस स्थानकाच्या हद्दीत तणावपूर्व स्थिती.

अभिजात भाषेच्या दर्जामुळे 'स्पृष्य-अस्पृष्यता' वाढीस! मराठीला दर्जा देण्यास उशीर; दामोदर मावजो

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास उशिरच झाला. या अगोदर तो मिळणे अपेक्षीत होते. पण विकसीत भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देणे म्हणजे उरलेल्या भाषांना कमी लेखणे हे माझे ठाम मत. अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने स्पृष्य आणि अस्पृष्यता वाढीस लागण्यासारखे आहे. ह्यावर विचार होणे गरजेचे. लेखक दामोदर मावजोंचे प्रतिपादन.

सुभाष वेलिंगकरांवर सरकार कारवाई करेल; मंत्री सिक्वेरांना विश्वास!

सेंट फ्रान्सिस झेवियर यांची डीएनए चाचणी करण्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल सरकार त्यांच्यावर कारवाई करेल. मंत्री आलेक्स सिक्वेरांचे वक्तव्य.

चिखली ग्रामपंचायतीला 'संपूर्ण स्वच्छता पुरस्कार २०२४'

चिखली ग्रामपंचायतीला पूर्ण स्वच्छता राखल्याबद्दल' मंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते 'संपूर्ण स्वच्छता पुरस्कार २०२४' प्रदान.

वेलिंगकरांविरोधात ख्रिस्ती बांधव आक्रमक, अटक करण्याची मागणी

सुभाष वेलिंगकर याना त्वरित अटक करण्याची मागणी, हरमलच्या संतप्त ख्रिस्ती बांधवांचे पोलिसांना निवेदन. पोलिस स्थानकावर ख्रिस्ती बांधवांची गर्दी.

न्हयबाग येथे ट्रक कलंडला!

न्हयबाग पेडणे येथे राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा अपघात. पोलीस घटनास्थळी दाखल. तपास सुरू.

IFFI Goa 2024: ईफ्फीसाठी प्रतिनिधी नोंदणी सुरू!

राज्यात २० ते २८ दरम्यान सुरु होणाऱ्या ५५व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (IFFI) प्रतिनिधी नोंदणीला सुरूवात.

सरकारी शाळेंकडे पालकांचा वाढता कल!

सरकारी शाळेंना प्राधन्य देण्यास सरकार कठीबद्ध आहे. तसेच अनुदानित शाळांपेक्षा पालक सध्या सरकारी शाळांना प्राधान्य देत असल्याचे पाहावयास मिळते.

मांडवी आणि झुआरी नद्यांमधील वाळू उत्खननाला मंजुरी!

राज्य तज्ञ मूल्यांकन समितीकडून मांडवी आणि झुआरी नद्यांमधील वाळू उत्खननाला मंजुरी. दरवर्षी 1,000 घनमीटर वाळू काढण्यासाठी खाण व भूविज्ञान खात्यांकडून परवानगी मिळवणे गरजेचे.

कुडचडे बाजारात अपघात, कारची पाच वाहनांना धडक

कुडचडे बाजारात कारची पाच वाहनांना धडक बसली असून, सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. दरम्यान, घटनास्थळी जखमी बेशुद्ध झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात विविध कारचे नुकसान झाले आहे.

रावणफोंड येथे अपघात

रावणफोंड येथे कारचा अपघात. कारचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाल्याची घटना. सुदैवाने जिवीतहानी नाही.

कोने, प्रियोळ येथे भीषण अपघातात एक ठार!

कोने, प्रियोळ येथे मालवाहू ट्रक व दुचाकी मध्ये भीषण अपघात. दुचाकीस्वार अनुराधा पाध्ये (६२) यांचा मृत्यू; तर दुचाकीचालक योगेश पाध्ये गंभीर जखमी. ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT