Ravi Naik Demise Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'पात्रांव!' रवी नाईक यांनी घेतला अखेरचा निरोप; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Latest Live News In Marathi: कृषी मंत्री रवी नाईक यांचे निधन, राजकारण, गुन्हे, पर्यटन, कला - क्रीडा - संस्कृती यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी.

Pramod Yadav

'पात्रांव!' रवी नाईक यांना अखेरचा निरोप

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते रवी एस. नाईक यांच्या पार्थिवावर आज, बुधवारी (१५ ऑक्टोबर) त्यांच्या मूळ गावी फोंडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी, फोंडा येथील रस्त्यांवर हजारो नागरिकांचा जनसागर लोटला होता.

रवी नाईक यांच्यावर अंतिम संस्कार; Watch Video

दिवंगत मंत्री रवी नाईक यांच्या अंतिम दर्शनासाठी भलीमोठी रंग; Watch Video 

रवी नाईक सारखे नेते शोधणे कठीण

रवी नाईक सारखे नेते शोधणे कठीण आहे. त्यांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल: चर्चिल आलेमाव, गोव्याचे माजी मुख्यमंत्री

सार्वजनिक सुट्टीमुळे दावर्ली पंचायत निवडणूक रद्द, उडाला गोंधळ

मंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे जाहीर झालेल्या सार्वजनिक सुट्टीनंतर दावर्ली पंचायत सरपंच निवडणूक रद्द करण्यात आली. चार अर्ज दाखल झाले होते, परंतु बीडीओने अनपेक्षितपणे पुन्हा उमेदवारांना निवडणुकीसाठी बोलावल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर गोंधळ उडाला, काही पंचायत सदस्यांनी स्थानिक आमदारांचा निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव पाडण्यात सहभाग असल्याचा आरोप केला.

मंत्री रवी नाईक यांच्या निधनाबद्दल अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले दुःख

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री रवी नाईक जी यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि समर्थकांना मनापासून संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो: अरविंद केजरीवाल, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री

गोव्याच्या राजकारणात रवी नेहमीच आठवणीत राहतील; विजय सरदेसाई

गोव्याच्या राजकारणात रवी नाईक नेहमीच स्मरणात राहतील, असे मत आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याकडून रवींना श्रद्धांजली

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी मंत्री रवी नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली. राणे यांनी नाईक यांच्या खरपाबांध येथील निवासस्थानी भेट देऊन रवींच्या पार्थीवाचे दर्शन घेतले.

गोव्यात एक दिवसाची शासकीय सुट्टी; तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर

मंत्री रवी नाईक यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात एक दिवसाची शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर, राज्यात १५ ते १७ ऑक्टोबर तीन दिवसांसाठी राज्य दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

त्यांची कारकीर्द गोवेकरांना कायम स्मरणात राहील! देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रवींना श्रद्धांजली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांची कारकीर्द गोवेकरांना कायम स्मरणात राहील! अशा शब्दात फडणवीसांनी रवींना श्रद्धांजली दिली.

कृषीमंत्री रवी नाईक यांच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसागर, सायंकाळी होणार अंत्यविधी

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान रवी नाईक यांचे रात्री बाराच्या सुमारास निधन झाले. रवी यांच्यावर खाडपाबांध येथे सायंकाळी चारच्या सुमारास सरकारी इतमामात अंत्यविधी होणार आहे. रवी यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. रवींच्या अखेरच्या दर्शनासाठी राज्यातून नेते, मंत्री, आणि नागरिकांनी हजेरी लावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Israel Crime: इस्त्रायलमध्ये भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; 31 वर्षीय संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT