North Goa Police Dainik Gomantak
गोवा

उत्तर गोव्यातील घरफोड्यांच्या पर्दाफाश, अट्टल चोरासह फर्स्ट ईयरच्या विद्यार्थ्याला अटक; राज्यातील ठळक बातम्या

Pramod Yadav

ब्रॉयलर चिकनची वाहतूक करणाऱ्यांवर लक्ष द्या; गोवा पोल्ट्री संघटना

ब्रॉयलर चिकनची वाहतूक करणाऱ्या अनधिकृत पोल्ट्री व्यापाऱ्यांची तपासणी चेकपोस्टवर करण्यात यावी. तसेच या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी अखिल गोवा पोल्ट्री संघटनेने केली आहे.

पणजीच्या पोलिस मुख्यालयात मुख्यमंत्र्यांनी महिला पिंक फोर्स तसेच महिला पोलिस कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी राज्यात घडणाऱ्या महिलांवरील अत्याचारांना कसा आळा घालता येईल यावर चर्चा करण्यात आली. त्यासाठी शाळा, कॉलेज, पंचायतीमध्ये जागृती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

उत्तरेतील घरफोड्यांच्या पर्दाफाश, अट्टल चोरासह फर्स्ट ईयरच्या विद्यार्थ्याला अटक

उत्तर जिल्ह्यात मध्यरात्री होणाऱ्या घरफोड्यांच्या पर्दाफाश. मुख्य आरोपी अट्टल चोर मारिया सांतान बाप्तीसा (वय ४४, बाणावली) व महम्मद सुफियान (वय २०, नवेली मडगाव) यांना अटक. महम्मद सुफीयान हा वाणिज्य शाखेचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे.

अजब प्रकार! भटजींनी फुले न दिल्याने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीची पुजा नाही

पिसुर्ले सत्तरीतील रवळनाथ देवस्थानात परंपरेप्रमाणे भटजींकडून फुले न आल्यामुळे नवरात्रीतील देवाची पुजा झाली नसल्याची हनुमंत परब ह्यांची फोनवरून माहिती. चर्चेसाठी सत्तरी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कचेरीत संध्याकाळी (३ ऑक्टोबर) बोलावली बैठक.

श्री भूमिका मंदिर टाळा प्रकरण; अखेर स्थिती नियंत्रणात!

आश्वे येथील श्री भूमिका मंदिरात पेडणेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांची बैठक. उद्या ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता होणाऱ्या बैठकीत दोन्ही गटांना उपस्थित राहण्याची सूचना.

नाटकी आमदाराची २०२७ ची तयारी सुरु; केळशी सरपंच डिक्सन

कुणालाही बेकायदेशीर बांधकाम परवाना दिलेला नाही. राजकारणासाठी व्हेंझी व्हिएगस यांनी केळशी गाव व पंचायतीची बदनामी करु नये. फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी भेट का घेतली तेही उघड करा. सरपंच डिक्सन आमदार व्हेझीवर भडकले.

वीज जोडणी संदर्भात खात्याचे कर्मचारी पैसे मागत असल्यास तक्रार करा; ऊर्जामंत्री

आम्ही घरांना मोफत वीज जोडणी दिलीय. या जोडणी संदर्भात वीज खात्याचे कर्मचारी कुणी पैसे मागत असल्यास त्याचे रिकॉर्डिंग करावे व खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना पाठवावे. त्यानंतर आम्ही कारवाई करू : ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर

आलेमावांचा डीएनए सर्व गोव्याला ठाऊक; भाजप प्रवक्ता

युरी आलेमाव यांचा डीएनए हा आलेमावांचा. आणि आलेमावांचा डीएनए कांय हे सर्व गोवेकरांना ठाऊक. कॉंग्रेस हिंदुत्ववादी संघटनांवर का हल्लाबोल करताय त्याचे कारण कळत नाही. भाजपचे प्रवक्ते गिरीराज वेर्णेकरांची टीका.

हरवळे पंचायत निवडणूक; उमेदवारी अर्जांचा श्रीगणेशा

उमेदवारी अर्जांचा श्रीगणेशा. हरवळे पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अखेर प्रारंभ. गुरुवारी (ता. 3) माजी सरपंच राजू मळीक यांच्यासह तिघाजणांनी भरले उमेदवारी अर्ज. निर्वाचन अधिकारी प्रवीण गावस यांची माहिती.

सरकारच्या 'या' प्रस्तावित कायदे दुरुस्त्या गोवेकरांच्या हिताच्या!

कोमुनिदाद कायद्यातील झोन न बदलण्याची प्रस्तावीत दुरुस्ती आणि भाडेकरू पडताळणी कायदे दुरुस्ती ही गोवेकरांच्या हिताची. याचे सर्वांकडून स्वागत अपेक्षित. भाजप प्रवक्ते ॲड. यतीश नायकांचे प्रतिपादन.

गोंयच्या सायबाबाबत आक्षेपार्ह विधान! वेलिंगकरांच्या अटकेची मागणी; PM मोदी, राहुल गांधींना पत्र

सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रांसिस झेव्हियर यांच्या डीएनए चाचणी संदर्भात केलेले वक्तव्य चुकीचे. राज्यातील ख्रिस्ती बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या संदर्भात त्वरित कारवाई करण्याचे वॉरेन आलेमाव यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी.

डिचोलीतील पोर्तुगिजकालीन पुलासह इतर पुलांची तपासणी

डिचोलीतील पोर्तुगिजकालीन पुलासह इतर पुलांची तपासणी. मुंबईस्थित स्ट्रकवेल सल्लागार कंपनीकडून मोबाईल ब्रिज इन्स्पेक्शन युनिटच्या सहाय्याने पुलांच्या स्थिरतेची केली तपासणी. अहवालानंतर पुढील निर्णय.

श्री भुमिका मंदिराला टाळे?

रात्री अचानक आश्वे येथील श्री भुमिका मंदिराला कुणीतरी लावले टाळे. पोलिसांना तक्रार केली असता मामलेदार, पोलिस घटनास्थळी हजर राहिले परंतु कारवाई करण्याऐवजी दोघांचेही एकमेकांवर बोट.

सुभाष वेलिंगकरांवर लवकरात लवकर कारवाई करा; आलेमाव बापलेक पोलिसांत

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची 'डीएनए चाचणी करा' या सुभाष वेलींगकरांच्या आक्षेपार्ह मागणी विरोधात चर्चिल आणि वालांका आलेमावांची कोलवा पोलिस स्थानकात तक्रार. लवकरात लवकर वेलिंगकरांवर कारवाईची मागणी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhumika Temple: नवरात्रीच्या पूर्वसंध्येला भूमिका मंदिराला टाळा कोणी लावला; दोन गट आमने - सामने, हस्तक्षेप न करण्याची सूचना

शव झेवियर यांचेच हे सिद्ध व्हायला नको का? एवढा राग कशासाठी? सुभाष वेलिंगकर DNA चाचणीवर ठाम

Ashwem News: अखेर वाद आटोक्यात!! दोन्ही गटांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची ४ ऑक्टोबर रोजी पुन्हा बैठक

Goa Politics: भाजपचा डिएनए गोंधळला की ते 'आरएसएस'च्या कुबड्या वापरतात; काँग्रेसची वेर्णेकरांवर टीका

Navratri in Goa: गोव्यात नवरात्रौत्सवाची दणक्यात सुरुवात; विविध कार्यक्रमांचे आयोजन

SCROLL FOR NEXT