Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'मॉडिफाईड सायलन्सर' बसवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दोन दुचाकी जप्त, वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa News Live Updates In Marathi: गोव्यातील राजकारण, समाजकारण, कला - क्रीडा - संस्कृती, पर्यटन, गुन्हे, अपघात, इव्हेंट, कार्यक्रम यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.

Pramod Yadav

Bicholim: 'मॉडिफाईड सायलन्सर' बसवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दोन दुचाकी जप्त

'मॉडिफाईड सायलन्सर' बसवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. डिचोलीच्या वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

तुळशी विवाहाची जय्यत तयारी; साहित्य खरेदीसाठी साखळी बाजारात गर्दी

राज्यात तुळशी विवाहाची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. साहित्य खरेदीसाठी साखळी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळतेय.

Bicholim: डिचोलीत बिबट्याची पुन्हा दहशत

डिचोलीतील धबधबा येथे बिबट्याची पुन्हा दहशत पाहायला मिळाली. बिबट्यानं भर लोकवस्तीत कुत्र्यावर हल्ला केला. या घटनेचं दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

Valpoi: वाळपई येथील पोस्ट ऑफिसमध्ये चोरी

वाळपई पोस्ट ऑफिसमध्ये चोरीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे.

केळशीचे सरपंच डिक्सन वाझ बाणावलीतून लढवणार विधानसभा निवडणूक

केळशीचे सरपंच डिक्सन वाझ आगामी २०२७ ची विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. कोलवा समुद्रकिनाऱ्यावर ज्यापद्धतीने विकास सुरु आहे, त्याचा कळंगुट करण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे माझ्यासह अनेकजण नाराज आहेत, असे वाझ म्हणाले.

Goa Murder Case: 19 वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी कांदोळी येथील तरुणाला अटक

पीर्ण येथे झालेल्या १९ वर्षीय कपिल चौधरी याच्या खूनप्रकरणी कांदोळी येथून गुरुदत्त लवांडे याला अटक करण्यात आली आहे. संशयित लवांडे यांनी कपिलला चार चाकी भाड्याने दिली होती. कपिल चारचाकी घेऊन कणकवली येथे गेल्याचे समजता संशयिताने त्याचा पाठलाग करुन त्याला गाठले. संशयितांनी चौधरीला लाथा, बुक्क्यांनी मारहाण केली यातच त्याचा मृत्यू झाला.

'फोंड्याची उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल, मी नाही'; CM सावंत

फोंडा पोटनिवडणुकीबाबत भाजप उमेदवारीचा चेंडू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पक्षाच्या कोर्टात टाकला आहे. फोंड्याच्या उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय पक्ष घेतो, मी नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचा कहर, साखळीत वाळंवटी नदीला पूर

गोव्यात मान्सूनोत्तर पावसाने गेल्या काही दिवसांपासून कहर घातला आहे. पहिल्यांदाच साखळीतील वाळंवटी नदीला पूर आला असून, नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. बाजारात पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपने पाणी बाहेर काढण्याची काम सुरु करण्यात आले आहे.

फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष आनंद नाईक यांचा राजीनामा

फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष आनंद नाईक यांनी राजीनामा दिला आहे. अलिखित करारानुसार त्यांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. नाईक यांच्याजागी वीर ढवळीकर यांची नगराध्यक्षपदावर विराजमान होतील.

Goa Tourism: गोवा पर्यटन कमी नव्हे वाढतंय! पर्यटनमंत्र्यांनी दिली आकडेवारी

गोव्याचे पर्यटन कमी होत असल्याचा दावा सोशल मीडियावरुन केला जात असला तरी ते पूर्णपणे असत्य आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी राज्यात देशी पर्यटकांमध्ये ५.४ टक्के आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये २९.३ टक्के वाढ झाली आहे, असे खंवटे म्हणाले. जानेवारी ते सप्टेंबर २०२५ याकाळात राज्यात ६.२ टक्के पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितलेगोव्याचे पर्यटन कमी होत असल्याचा दावा सोशल मीडियावरुन केला जात असला तरी ते पूर्णपणे असत्य आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी राज्यात देशी पर्यटकांमध्ये ५.४ टक्के आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये २९.३ टक्के वाढ झाली आहे, असे खंवटे म्हणाले. जानेवारी ते सप्टेंबर २०२५ याकाळात राज्यात ६.२ टक्के पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Uguem Firing: उगवे गोळीबार प्रकरणात दोघे पोलिस! एकूण 5 जणांना अटक; गुप्तचर यंत्रणेच्या आधारे कारवाई

Rohit Sharma: फायनलचा थरार... भारतीय महिला संघाला सपोर्ट करण्यासाठी 'मुंबईचा राजा' मैदानात Watch Video

व्हागातोर नाईट क्लबमध्ये अरेरावीचा कळस! बाऊन्सर्सनी पर्यटकांना बडवले; लोखंडी सळ्या, दांडक्यांनी केली मारहाण

Isro Satellite Launch: इस्रोनं रचला नवा विक्रम! सर्वात वजनदार 'CMS-03' उपग्रह यशस्वीरित्या लॉन्च, भारतीय नौदलाची ताकद वाढणार Watch Video

21 वर्षी काव्यश्री कूर्से बनली कमर्शियल पायलट; Watch Video

SCROLL FOR NEXT