सुयश प्रभुदेसाई (120) याच्या शानदार शतकाच्या जोरावर रणजी करंडक प्लेट विभाग क्रिकेट सामन्यात गोव्याने मणिपूरविरुद्ध पहिल्या दिवशी 7 बाद 302 धावा काढल्या.
राज्यात अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. सुके कुळण, धारगळ येथे कार आणि खडीवाहू ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी टळली.
हरवळे पंचायत निवडणूकीत एक उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. प्रभाग-1 मधून देमगो सुकडो मळीक यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे. अन्य चार प्रभागांतून मिळून अंतिम 12 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
हाऊसिंग बोर्ड येथे गोवा पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत महाराष्ट्रातील सांगली येथील शाहीद रईस मोहम्मद (वय वर्ष 20) याला पकडण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 71,000 रुपयांचा 718 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
आज (11 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता डिचोली पोलिसांचा फोन आला, मी त्यांना सर्व आवश्यक ती माहिती दिली. एवढंच नाहीतर मी त्यांना पूर्ण सहकार्य करेन अशी ग्वाहीही दिल्याचे सुभाष वेलिंगकरांनी सांगितले.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या सुभाष वेलिंगकरांनी आज (11 ऑक्टोबर) दुसऱ्यांदा डिचोली ठाण्यात हजेरी लावली. यावेळी पोलिसांनी वेलिंगकरांची 3 तास कसून चौकशी केली.
परप्रांतियाकडून स्थानिक मुलीवर झालेल्या हल्ल्यासंदर्भातील तपासाची सध्यस्थिती जाणून घेण्यासाठी पेडणेवासी पोलिस ठाण्यावर जमले. भाडेकरुंची पडताळणी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली.
GMC मध्ये झालेल्या चोरी पाश्वभूमीवर मी डीनला याबाबत अहवाल देण्याचे सांगितले आहे. वसतिगृहे, कॉरिडॉरसह जीएमसीचे सर्व वॉर्ड दीड महिन्यात सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्यात येतील: विश्वजित राणे, आरोग्यमंत्री.
सुभाष वेलिंगकर चौकशीसाठी पुन्हा डिचोली पोलीस स्थानकात. शुक्रवारी सकाळी सलग दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी पोलिस स्थानकात. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वेलिंगकर यांनी गुरुवारी सायंकाळी पोलिस स्थानकात लावली होती उपस्थिती.
आरटीआय कायदा लवकरच कोंकणी भाषेत प्रसारित होणार. आरटीआय कायद्याच्या कलमा प्रमाणे प्रत्येक राज्याने त्यांच्या प्रादेशिक भाषेत आरटीआय कायदा प्रसारित करणे गरजेचे. त्या कलमा नुसार गोव्यातही लवकरच आरटीआय कायदा कोकणी भाषेत. - राज्य माहिती आयुक्त आत्माराम बर्वे यांची घोषणा.
खोतोडे सत्तरी येथील कलाकार संदेश हरवळकर यांनी स्व. रतन टाटा यांची रांगोळी रेखाटून त्यांचा श्रध्दांजली वाहिली.
नवरात्रोत्स मंडळ हरमल आयोजित कार्यक्रमात मांद्रेचे माजी सरपंच आणि विद्यामान पंच प्रशांत नाईक यांचा माजी आमदार श्री दयानंद सोपटे यांच्या हस्ते सन्मान.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.