Dainik Gomantak
गोवा

Goa News: चोर्ला घाटातील वाहतूक पुन्हा सुरळीत, दरड कोसळल्यामुळे होती ठप्प; वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी

Goa Today's 20 June 2025 Live News: गोव्यातील राजकारण, गुन्हे, कला - क्रीडा, संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी.

Sameer Panditrao

चोर्ला घाटातील वाहतूक पुन्हा सुरळीत; दरड कोसळल्यामुळे होती ठप्प!

चोर्ला घाटातील मुख्य रस्त्यावर झाड आणि दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, डिचोली वाहतूक पोलिस इन्चार्ज किशोर आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले झाड आणि माती हटवण्यात आली. वाहतूक पुन्हा सुरळीत.

तुये औद्योगिक वसाहतीत अमोनिया गॅसची गळती, सुदैवाने जीवीतहानी टळली!

तुये औद्योगिक वसाहतीतील आईस क्यूब फॅक्टरीमध्ये अमोनिया गॅसची गळती झाली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही.

तिस्क-उसगाव येथे टेम्पोची स्कूटरला धडक, दोघे जखमी

तिस्क-उसगाव येथे टेम्पोची स्कूटरला धडक. स्कूटर वरील दोघेजण जखमी. जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Sudin Dhavalikar: सुदिन ढवळीकरांनी घेतलं देव घृष्णेश्वराचं दर्शन

वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या देव घृष्णेश्वराचं दर्शन घेतले. या वेळी त्यांनी विधिपूर्वक अभिषेक सेवा देखील केली.

Pernem: पेडण्यात सॉफ्ट ड्रिंकचा ट्रक उलटला, सुदैवाने जीवितहानी टळली

पेडणे सर्विस रस्त्यावर आज एक सॉफ्ट ड्रिंकने भरलेला ट्रक उलटल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Curchorem: कुडचडेत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या झारखंडमधील कामगाराला रंगेहाथ पकडलं

झारखंडमधील एका स्थलांतरित कामगाराला कुडचडे येथे रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररित्या कचरा टाकताना स्थानिक तरुण प्रबल वस्ता यांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्या कामगाराला पुढील कारवाईसाठी तात्काळ कुडचडे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

ऑक्टोबरमध्ये होणार पर्पल फेस्ट

गोव्यातील पर्पल फेस्ट ०९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे.

साखळीत ड्रिंक अँड ड्राईव्ह, हिट अँड रननंतर फरार झालेले अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या कारने दुचाकीला साखळी येथे जोराची धडक दिली. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. कारचालक मुलगा आणि इतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्यानंतर सर्वांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

कोलवा येथे बैलांची बेकायदेशीर झुंज; दोघांविरोधात गुन्हा

कोलवा येथे बैलांची बेकायदेशीर झुंज आयोजित केल्याप्रकरणी लियाकत अली शेख आणि कोणसेसाव रॉड्रिग्ज यांच्याविरोधात कोलवा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. बेताळभाटी येथे खुल्या मेदानात ही झुंज आयोजित करण्यात आली होती. प्राण्यांविरोधात क्रूरता केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: मान्सून म्हणतोय,"राम राम"! गोव्यात पावसाचा जोर घटला; ऑक्टोबर हीटची चाहूल

Charter Flight: पर्यटन हंगामाची दणक्यात सुरुवात! रशियातून पहिले चार्टर विमान मोपा विमानतळावर दाखल; गोव्याचे पारंपरिक आदरातिथ्य

Bethora Road Issue: बेतोड्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय

Goa Politics: खरी कुजबुज, मायकल जागे झाले!

Asia Cup Controversy: पाकडे रडतच बसणार... "कप देतो, पण माझ्याकडूनच घ्यावा लागेल" नक्वींचा बालहट्ट काय

SCROLL FOR NEXT