दूधसागर धबधबा Dainik Gomantak
गोवा

दूधसागर धबधबा पर्यटन! चोवीस तासांत समस्येवर तोडगा काढणार; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Breaking News Today Live: दिवाळी, पर्यटन, क्रीडा, कला - संस्कृती, राजकारण, गुन्हे यासह राज्यातील विविध ठळक घडामोडी.

Pramod Yadav

दिवाळीत पावसाची आतषबाजी; यलो अलर्ट, फोंड्यात सर्वाधिक बरसात

ईशान्य मॉन्सूनच्या प्रभावातून तसेच निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पावसाचा तडाखा राज्याला बसत आहे. ऐन दिवाळीत पडलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात सरसरी एकूण ४३.३ मिमी म्हणजेच १.७० इंच पावसाची नोंद करण्यात आली असून फोंड्यात सर्वाधिक ८७.४ मिमी म्हणजेच तब्बल ३.४४ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आज व उद्या शनिवारी मध्यम पावसाची शक्यता असल्याने गोवा वेधशाळेने यलो अलर्ट जारी केला आहे.

भातशेतीवर परिणाम

राज्यात थंडी पडायच्या दिवसांत अजूनही पाऊस पडत असल्याने त्याचा परिणाम भातशतीवर झाला आहे. भातशतीची कामे खोळंबल्याने शतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. पावसामुळेदिवाळीच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.

आम्हाला निकाल अपेक्षितच होता; गिरीश चोडणकर

आम्हाला निकाल अपेक्षितच होता. हा निकाल म्हणजे फक्त झेरॉक्स कॉपी. अपत्रता याचिकेवर दोन वर्षानंतर निकाल लागला यातच आमचे यश. आता पुढची भूमिका कायदेशीर सल्ला घेतल्यावर - गिरीश चोडणकर

Dudhsagar: येत्या चोवीस तासांत दूधसागर समस्येवर तोडगा काढणार; माजी आमदार पाऊस्कर

येत्या चोवीस तासांत दूधसागर धबधबा पर्यटनाच्या समस्येवर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन माजी आमदार दीपक पाऊस्कर यांनी दिले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गणेश गावकर यावर तोडगा काढतील असे पाऊस्कर म्हणाले.

कळंगुट पर्यटक मारहाण प्रकरण; दोषींविरोधात सक्त कारवाईची मागणी

कळंगुट येथे पुण्याच्या पर्यटकांना मारहाण केल्याचे प्रकरण उघडकीस आले, या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाईची मागणी स्थानिक टॅक्सी चालकांनी केली आहे.

Goa Rain: पावसाचा शेतीला फटका; सत्तरीत भात शेतीचे नुकसान

सत्तरीत मुसळधार पावसाने शेती पाण्याखाली. शेतकऱ्यांना मोठा फटाका. पावसामुळे कापणी लांबणीवर.

Calangute: कळंगुट पर्यटक मारहाण प्रकरण; एका टॅक्सी चालकाला अटक

कळंगुट येथे पुण्यातील पर्यटक कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी एका टॅक्सी चालकाला अटक करण्यात आली आहे. आणखी एका टॅक्सी चालकाचा शोध सुरु असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

All Souls Day: सोल्स डे साठी गोव्यात बीफचा तुटवडा, कॅथलिक समाजाचे सरकारला साकडे

कॅथलिक समाजाच्या सोल्स डे साठी गोव्यात बीफचा तुटवडा निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते मिलाग्रीस फर्नांडिस यांनी सरकारने बीफची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.

Calangute: कळंगुट येथे गैरवर्तन करणारे पाचजण ताब्यात

कळंगुट येथे गैरवर्तन करणाऱ्या पाचजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अमित कुमार (झारखंड) याच्यासह आणखी चारजणांना ताब्यात घेतले आहे. कळंगुट पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टॅक्सी बाजुला घ्यायला सांगितल्याने मारहाण; दिवाळीला गोव्यात गेलेल्या कुटुंबीयांसोबत घडला धक्कादायक प्रकार

MLA Disqualification Petition: ये तो होना ही था! चोडणकरांची आमदार अपात्रता याचिका सभापती तवडकरांनी फेटाळली

आमदार अपात्रता याचिका; निकालापूर्वीच चोडणकरांना सतावतेय चिंता, सभापतींच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

Samruddhi Expressway: प्रगतीचे मार्ग खुले करणारा 'समृद्धी महामार्ग', मुंबई ते नागपूर अंतर झाले कमी

All Souls Day: ‘सोल्स डे’साठी गोव्यात बीफचा तुटवडा; कॅथलिक सामाजिक कार्यकर्त्यांचे सरकारला साकडे

SCROLL FOR NEXT