Assagao House Demolition Dainik Gomantak
गोवा

Goa Top News: आसगाव प्रकरण आजही गाजले, डीजीपींवर संशयाची सुई, विरोधक आक्रमक; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Today's 28 June 2024 Live Breaking News: आसगाव घर मोडतोडप्रकरणी डीजीपी वादाच्या भोवऱ्यात, विरोधी पक्षातील नेते आक्रमक कारवाईची मागणी, राज्यातील ठळक बातम्या.

Pramod Yadav

...म्हणून आम्हाला बाऊन्सर लागत नाहीत; रमेश तवडकर

आम्ही जी घर बांधतो ती कोणत्या वादात सापडत नाहीत. आम्ही चर्चा करूनच आणि त्या आणि आजुबाजूच्या लोकांना मान्य आहे तरच घर बांधण्याचा निर्णय घेतो आणि त्यामुळे आम्हाला बाऊन्सर वगैरे लागत नाहीत : रमेश तवडकर

माविन गुदिन्हो यांनी घेतली अर्थमंत्री सितारामण यांची भेट

गोव्याचे वाहतूक, उद्योग, पंचायत राज मंत्री माविन गुदिन्हो यांनी नवी दिल्लीत घेतली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांची भेट.

...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस

गोव्याचे पोलिस महासंचालक थेट मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करतात. मुख्यमंत्र्यांना हे प्रकरण माहिती असल्यास त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांना जर माहिती नसेल तर त्यांनी महासंचालकांना निलंबित करावे.

तसेच, त्यांची चौकशी करावी यात गेल्या पाच सहा वर्षातील गुन्ह्यांबाबत देखील चौकशी व्हावी. कारण कारवाई नये असा दबाव पोलिसांवर असू शकतो - खासदार विरियातो फर्नांडिस

आसगाव घर मोडतोड प्रकरण; तीन महिला बाऊन्सर्स अटकेत

आसगाव घर मोडतोड प्रकरणी गुन्हे शाखेकडून तीन महिला बाऊन्सर्सला अटक. शाहीन सौदागर (38), शालन मोरेकर (42) (दोघीही रा. कांदोळी) आणि बिसमिल्ला गोरुंदागी (44, रा. नेरुळ) यांना अटक.

मुंबईतून गोव्यात आलेले खाद्यपदार्थ एफडीएकडून म्हापसा येथे जप्त

म्हापसा नवीन बसस्थानकावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा छापा. मुंबईतून गोव्यात येणारे फ्रोजन फूड, मावा, मसाले यासारखे खाद्यपदार्थ जप्त. FDA चे रिचर्ड नोरोन्हा, राजाराम पाटील यासह इतर अधिकाऱ्यांची कारवाई.

'तो' निनावी आणि स्वाक्षरी नसलेला अहवाल, निष्कर्ष काढणे घाईचे - गुन्हे शाखा एसपी

'निनावी आणि स्वाक्षरी नसलेला हा अहवाल आहे. याबाबत कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. समोर आलेल्या तथ्यांनुसार तपास सुरू आहे.'

हणजूण पोलिस निरीक्षकांनी डीजीपी जसपाल सिंग यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याबाबत गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांची माहिती.

पोलिस महासंचालकांना बडतर्फ करुन तपास CBI कडे द्या - कार्लुस फेरेरा

मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांना बडतर्फ करुन त्यांना या प्रकरणात सहआरोपी करावे. तसेच, याप्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) विभागाकडे सोपविण्यात यावा. हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी मागणी.

Vijai Sardesai: गोवा पोलिस खाते आता अधिकृत सुपारी घेणारे खाते!

गोव्याच्या पोलिस खात्यावरील विश्वास आता उडालेला आहे‌. ते आता अधिकृत सुपारी घेणारे खाते बनले आहे‌. आसगांव घर मोडतोड प्रकरणावरुन गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंचा घणाघात.

DGP Vs Utpal Parrikar: डीजीपींचे ट्विट आणि उत्पल पर्रिकरांचे खडे बोल!

आसगाव घर मोडतोड प्रकरणाच्या तपासावर डीजीपी जसपाल सिंगांच्या ट्विटवर उत्पल पर्रिकरांचे खडे बोल. ट्विट करुन पोलिसांवरील उडालेला विश्वास पुन्हा येणार नाही- उत्पल पर्रिकर

PNG Theft: हातचलाखी करत चोरांनी पीएनजी ज्वेलर्सचे दागिने लुटले!

हातचलाखी करत चोरांनी सांतिनेज येथील पीएनजी ज्वेलर्सचे सुमारे ८ लाखांचे दागिने लुटले. दोन दिवसांपुर्वीची घटना. पणजी पोलिस स्थानकात तक्रार नोंद. चोरांचा तपास सुरू.

Assagao House Demolition: आसगाव घर मोडतोड प्रकरण, आमदार तुयेकर आक्रमक!

आसगाव घर मोडतोड प्रकरणी भाजप आमदार उल्हास तुयेकर आक्रमक. सगळ्या दोषींवर कारवाईची तुयेकरांची मागणी‌

Goa DGP: डीजीपी जसपाल सिंगांवर कारवाईची काँग्रेसची मागणी!

आसगाव घर मोडतोड प्रकरणी आयपीएस अधिकाऱ्याचा हात असल्याचा दावा सगळ्यात प्रथम काँग्रेस आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरांनी केला होता. आता हे बाब उघड. जसपाल सिंगावर केंद्रीय गृह खात्याने तात्काळ कारवाई करावी - अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

Assagao House Demolition: आसगावातील ते घर मोडण्यासाठी खुद्द डिजीपींकडून होता दबाव!

आसगावातील घर मोडतोडीसाठी खुद्द डीजीपी जसपाल सिंग यांच्याकडून होता दबाव.हणजूणचे निलंबीत पोलिस निरीक्षक प्रशल देसाईंची सनसनाटी जबानी. प्रकरणाला गंभीर वळण‌. जबानीत इतरही अनेक धक्कादायक खुलासे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सात दिवसांचा थरारक ट्रेक! पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सर केले किलिमांजारो शिखर, ठरले भारतातील 'पहिले महापौर'!

Vijayanagara Empire Goa: राजा देवराय याने 'गोवा' आपल्या आधिपत्याखाली आणला, विजयनगर साम्राज्याचा इतिहास

IND vs ENG 3rd Test: टीम इंडियाने षटकारांच्या बाबतीत रचला इतिहास, 50 वर्ष जुना विक्रम काढला मोडीत

Beti Ferry Boat: 'बेती' फेरीबोट प्रकरणाबाबत धूसरता; सरकारकडे चौकशी अहवाल सादर, पण 'ते' कारण अद्याप गुलदस्त्यात

Goa Politics: विरोधकांमधील फूट पुन्हा उघड! 'त्या' बैठकीवरुन सरदेसाईंचे युरींवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT