Goa Today's Breaking 18 April 2024 Live Update
Goa Today's Breaking 18 April 2024 Live Update Dainik Gomantak Marathi News
गोवा

Goa Today's News: RG च्या उमेदवारांचे अर्ज दाखल, राजकारण, गुन्हे विश्वातील गोव्यातील बातम्यांचा आढावा

Pramod Yadav

बेवारस बॅगेत सापडला चार लाखांचा गांजा

कोकण रेल्वे पोलिसांना मडगाव रेल्वे स्थानकावर बेवारस बॅगेत तीन लाख 96 हजार 900 रुपये किंमतीचा 3.969 किलोग्रॅम गांजा आढळून आला आहे.

ताळगाव निवडणूक ; सागर बांदेकर बिनविरोध

ताळगाव पंचायत निवडणुकीत आज अखेरच्या दिवशी ८ उमेदवारी अर्ज सादर झाले. आत्तापर्यंत अर्जांची संख्या एकूण २४ झाली आहे.

आमदार बाबूश मोन्सेरात व आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंटचे उमेदवार वॉर्ड १० मधील उमेदवार सागर रमेश बांदेकर यांचाच एकमेव रिंगणात राहिला आहे.

त्यामुळे बांदेकर बिनविरोध निवडून येणार हे स्पष्ट झाले आहे. केवळ आता त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होणे बाकी आहे.

ताळगाव पंचायत निवडणूक, २४ अर्ज दाखल

ताळगाव पंचायतीसाठी एकूण २४ अर्ज दाखल करण्यात आले असून, अखेरच्या दिवशी आठ अर्ज दाखल झाले आहेत. पंचायतीसाठी येत्या २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

गोव्यात यलो अलर्ट

IMD Goa

गोव्यात दोन्ही जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होण्याची शक्यता. सत्तरी, डिचोली, धारबांदोडा आणि सांगे तालुक्यात ढगाळ वातावरण राहणार. आवश्यक काळजी घेण्याचे हवामान खात्याचे आवाहन.

मला 60 हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्य मिळणार!

माझी प्रचाराची पहिली फेरी संपलीय. लोकांचा भरपूर चांगला प्रतिसाद मिळालाय. मी 60 हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्याने जिंकणार. विरोधकांना पाहिजे तस बोलू द्या मी त्यांच्याविशयी काहीच वाईट बोलणार नाही. दक्षिण गोव्याच्या भाजप उमेदवार पल्लवी धेंपेंचे प्रतिपादन.

आरजीच्या रुबर्ट परेरा यांचा दक्षिण गोव्यातून उमेदवारी अर्ज दाखल

रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाकडून रुबर्ट परेरा यांनी दक्षिण गोव्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

गोव्यातील इंडी आघाडीने लोकसभेसाठी नेमले प्रवक्ते!

गोव्यातील इंडी आघाडीकडून लोकसभा निवडणूकीसाठी प्रवक्त्यांची नेमणूक. तुलियो डिसोझा,अमरनाथ पणजीकर,मनिषा उसगांवकर,अॅड.जितेंद्र गांवकर, मायकल रिबेलो, अॅड.सुरेल तिळवे, वाल्मिकी नाईक, दुर्गादास कामत, विकास भगत, अॅड.अश्मा बी, अविनाश भोसले, जितेश कामत आणि जयेश शेटगांवकर यांची प्रवक्तेपदी नेमणूक.

अमित शहांची 24 एप्रिल रोजी गोव्यात प्रचारसभा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 24 एप्रिल रोजी गोव्यात प्रचारासाठी हजेरी लावणार आहेत. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आरजीच्या मनोज परब यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी उत्तर गोव्यातून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्याच्यासोबत आमदार विरेश बोरकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Manoj Parab Files Nomination

शिवोलीत 200 वर्षे जुने झाड कोसळले; वीज खांब आणि वाहनांचे नुकसान

शिवोलीत 200 वर्षे जुने झाड रस्त्यावर कोसळल्याने तीन वीज खांब, कार आणि सुरक्षा भिंतीचे नुकसान झाले. म्हापसा अग्निशमन दल, वीज खाते आणि पंचायत सदस्यांच्या मदतीने झाड हटविण्यात आले. यावेळी मार्गावर काहीकाळ वाहतूक खोळंबली होती.

Tree Collapses in Siolim

म्हापसा अर्बन बँक प्रकरण, 'पाहीजे तर पुन्हा एकदा फाईल उघडता येईल'!

म्हापसा अर्बन बँकेत तब्बल 4 लाख लोकांचे पैसे बुडालेत. ह्या बँकेचे प्रकरण केंद्रीय आरसीएकडे अजून सुरू आहे. 'पाहिजे तर पन्हा एकदा फाईल उघडता येईल' म्हापसा अर्बन बबँकेतक प्रकरणी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांचे वक्तव्य.

Mapusa Urban Bank

लाच प्रकरणी पोलिस हवालदार संशयित संजय तळकर याच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ

लाच प्रकरणी पोलिस हवालदार संशयित संजय तळकर याच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ. संशयित तळकर व उदयराज कळंगुटकर यांच्या जामीन अर्जावर २२ एप्रिलला सत्र न्यायालयात सुनावणी

पर्वरी लव्ह ट्रँगल खून प्रकरण; पाच संशयितांना पोलिस कोठडी

पर्वरी येथील लव्ह ट्रँगल खून प्रकरणी, खतेश कांदोळकर (कांदोळी), सुमन बरिक (ओर्डा कांदोळी), सचिन सहानी (ओर्डा कांदोळी), तनय कांदोळकर (कांदोळी) व सचिन सिंग (कांदोळी) या पाच संशयितांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

आम्ही लोकांना फसविण्यासाठी 'न्याय पत्र' काढत नाही!

Goa Bjp

इतर पक्षांप्रमाणे आम्ही लोकांना बसविण्यासाठी 'न्याय पत्र' वैगेरे काढत नाही. आमचे 'मोदी की गॅरेंटी' संकल्प पत्र चार प्रमुख मुद्यांवर आहे.इतर पक्षांप्रमाणे ते जाती आणि धर्माच्या मुद्द्यावर नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची इंडी आघाडीवर टीका.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa And Kokan Today's Live News: खोर्ली-म्हापसा येथे आढळला पुरुषाचा मृतदेह

Ponda News : दारूच्या नशेत पर्यटकांची दादागिरी; दाभाळ येथील प्रकार

Dengue News : डेंग्यू निर्मूलनासाठी लोकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे : आरोग्य उपसंचालक डॉ.कल्पना महात्मे

Lairai Devi jatra 2024 : ‘लईराई’चा कौलोत्सव अभूतपूर्व उत्साहात; शिरगावात भक्तिमय वातावरण

Cashew Production Declined: काजू पीक घटले; दारूभट्ट्या थंडावल्या, हंगाम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT