Goa Petrol-Diesel Price 11 June 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Diesel Prices: गोव्यातील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; जाणून घ्या पेट्रोल - डिझेलचे ताजे दर

Goa today's 11 June 2024 Petrol Diesel Prices: मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर इंधनाच्या दर कमी होतील अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना होती.

Pramod Yadav

Goa Petrol Diesel Prices

निवडणुकीपूर्वी मावळत्या भाजप सरकारने इंधनाच्या दरात किरकोळ घट केली. निकालानंतर पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत आले आहे. मोदी सरकार सर्वसामान्य नागरिकांना इंधनाच्या दरात दिलासा देण्याची शक्यता वर्तवली जाते. पण, अद्याप याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

तेल कंपन्यांनी 11 जूनसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या असून, गोव्यासह देशात इंधनाच्या दरात किरकोळ बदल झाला आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 95.53

Panjim ₹ 95.53

South Goa ₹ 95.10

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 88.09

Panjim ₹ 88.09

South Goa ₹ 87.66

जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर इंधनाचे दर ठरवले जातात. सध्या कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येत नाही. यावर राज्य सरकारकडून व्हॅट लावला जातो. प्रत्येक राज्यात व्हॅटचे दर वेगवेगळे असतात, त्यामुळे त्यांची किंमतही प्रत्येक राज्यात वेगळी असते.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT