Shripad Naik: श्रीपाद नाईकांना मोठी लॉटरी! मोदी 3.0 मध्ये थेट ‘या’ खात्याची जबाबदारी

Modi 3.0 Government: आता नाईकांकडे केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री पदाची जाबबदारी सोपवण्यात आली आहे.
Shripad Naik
Shripad NaikDainik Gomantak

Shripad Naik: नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपतींनी काल राष्ट्रपती भवनात पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांना शपथ दिली. शपथविधीनंतर कोणता मंत्री कोणत्या खात्याची कमान संभाळणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. आता यासंबंधीची यादी समोर आली आहे. उत्तर गोव्यातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या श्रीपाद नाईकांनीही काल केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता नाईकांकडे केंद्रीय उर्जा राज्यमंत्रिपदाची जाबबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, श्रीपाद नाईक यांचा केंद्रीय राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्याने गोव्याने मोदी 3.0 मंत्रिमंडळात एकमेव प्रतिनिधित्व मिळवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दोन्ही कार्यकाळात नाईक हे महत्वाचे मंत्री राहिले. त्यांनी केंद्रात गोव्याचे प्रतिनिधित्व केले. आताही त्यांनी मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळवले आहे.

Shripad Naik
Shripad Naik: श्रीपाद भाऊंच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ? उत्तर गोव्यातून बाजी मारताच चर्चांना उधाण

2014 ते 2017 हा काळ केंद्रीय मंत्रिमंडळात गोव्यातील प्रतिनिधींच्या संख्येच्या बाबतीत अपवाद होता, जेव्हा मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री होते, तर नाईक आयुष राज्यमंत्री होते. गोव्यातील सर्वात जास्त काळ खासदार राहिलेल्या नाईकांच्या कारकिर्दीची सुरुवात 1999 मध्ये झाली. तेव्हापासून ते प्रत्येक लोकसभा निवडणूक जिंकत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत नाईक यांनी पर्यटन आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com