Goa Daily News Wrap | Marathi Breakings 
गोवा

Goa Today's News Wrap: गोव्यात दिवसभर घडलेल्या गुन्हे, राजकारण, क्रीडा क्षेत्रातील ठळक घडमोडींचा आढावा

Goa Today's Live News Update: राज्यातील गुन्हे, राजकारण, पर्यटन, क्रीडा यासह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा आढावा.

Pramod Yadav

नंद्रण - मोले येथे कारचा अपघात, कर्नाटकच्या दोघांचा मृत्यू

Goa Accident

नंद्रण - मोले येथे गोव्याहून हुबळी येथे जाणारी कारची झाडाला बसून झालेल्या अपघातात भारत एम. तगरसी (43, हुबळी ) व नवीन नागेश रायकर (36, धारवाड) यांचा मृत्यू. संध्याकाळी 6:30 वाजता झाला अपघात.

बार्देश तालुक्यात बुधवारी वीज पुरवठा राहणार खंडित

बार्देश तालुक्यात येत्या बुधवारी (दि.10) पाच तास वीज पुरवठा राहणार खंडित. कोलवाळ औद्योगिक वसाहत, पाटो, मुशीरवाडो या भागात सकाळी 9 ते दुपारी दोन या काळात तर, दरबारवाडा, पीपल स्कूल आणि सभोवतालच्या परिसरात दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत वीज पुरवठा बंद ठेवला जाईल.

सुकूर येथील बेकायदा बांधकाम जमीनदोस्त

पर्वरी-सुकूर पंचायत क्षेत्रात : महामार्गासाठी सोडलेल्या जागेतील बेकायदेशीर बांधकाम आज, सोमवारी सकाळी उपजिल्हाधिकारी भगवान करमली यांच्या आदेशानुसार पूर्णपणे तोडण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिल्पी शर्मा यांनी एक भूखंड विकत घेतला. तेथे कायदेशीर सोपस्कार पार पाडून ७० चौरस मीटर जागेत बांधकामही सुरू केले; परंतु बांधकाम परवानगी मिळालेल्या जागेबाहेर म्हणजेच प्रस्तावित महामार्गासाठी सोडलेल्या जागेतही बांधकाम सुरू केले.

ही बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच ताबडतोब सर्व सोपस्कार पूर्ण करून मामलेदार व उपजिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी दाद मागितली. उपजिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू ऐकून बांधकाम पाडण्याचा आदेश दिला.

पर्येमळ - खोला येथे रान डुकराची शिकार करण्यासाठी झाडलेली गोळी लागून एकाचा मृत्यू

रान डुकराची शिकार करण्यासाठी झाडलेली बंदुकीची गोळी लागल्यामुळे एकाला प्राण गमवावा लागला. केपे- काणकोणच्या सिमेवरील पर्येमळ - खोला येथे ७ एप्रिल रोजी ही घटना घडली. माटवेकारांच्या देवाच्या पारंपरिक भोंवडीच्या वेळी ही घटना घडली.

पणजी येथील गीता बेकरी जवळ अपघात, एक जखमी

पणजी येथील गीता बेकरी जवळ टॅक्सी व दुचाकीमध्ये अपघात. दुचाकी चालक किरकोळ जखमी.

पेडणे पालिका नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणूक

पेडणे पालिकेच्या नगराध्यक्षपदी शिवराम तुकोजी तर उपनगराध्यक्षपदी विशाखा गडेकर यांची बिनविरोध निवड.

पैरा-शिरगाव येथे दुचाकींचा अपघात, २१ वर्षीय युवकाचा मृत्यू

Poira Accident

पैरा-शिरगाव येथे दोन दुचाकींचा अपघात झाला असून. यात २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. तर, इतर तीनजण जखमी झाले आहेत. पुष्पराज हळदणकर (रा. पैरा) असे मृत युवकाचे नाव आहे.

पैसा नव्हे पाठिंब्याची गरज - विजय सरदेसाई

Vijai Sardesai

गोंयकारपण संपविण्याच्या सरकारच्या डावामुळे तियात्र खेळांवर बंदी. मी आवाज उठवून ती बंदी मागे घ्यायला लावली. तियात्रांमधून सरकारची लक्तरे वेशीवर टांगली जातात म्हणुनच त्यांना ते नको आहे. तेव्हा आम्ही संघटित होणे ही काळाची गरज आहे.

गोंयकारपण राखण्यासाठी तुमचा पैसा नव्हे तर पाठिंब्याची गरज. विजय सरदेसाई यांचे युकेतल्या गोवेकरांना आवाहन.

Vijai Sardesai

पल्लवी धेंपे यांचे मूळगाव भाजप सरकारने गेल्या 12 वर्षांत उद्ध्वस्त केले आहे - मिशेल रिबेलो

गोव्यातील सर्वात खराब शहर मडगावमध्ये तुमचे स्वागत आहे. शहरात सध्या सुरु असलेल्या बेकायदेशीर बाबींचे ते आश्रयदाते असून, मडगावमधील गोंधळासाठी जबाबदार आहेत. पल्लवी धेंपे यांचे मूळगाव भाजप सरकारने गेल्या 12 वर्षांत उद्ध्वस्त केल्याचा आरोप काँग्रेस नेत्या आणि जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रिबेलो यांनी केला.

माशेत कदंब बस आणि कारमध्ये अपघात, एक ठार

Fatal accident at Mashem Canacona

माशे, काणकोण येथे कदंब बस आणि कारमध्ये झालेल्या अपघातात राजेश वेर्णेकर (कर्नाटक) याचा जागीच मृत्यू झाला. तर, पाच प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Fatal accident at Mashem Canacona

हरवळे वाद: लोकसभेसाठी भंडारी समाजाचा उमेदवार

Arvalem, Goa

लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यातून भंडारी समाजाचा उमेदवार देण्याची गोवा सिव्हील सोसायटीची चाचपणी सुरु. हरळेत रविवारी घडलेल्या घटनेतून समाज एकसंघ आणण्याचा प्रयत्न

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT