Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Pramod Yadav

Chorla Ghat Accident: चोर्ला घाटात अपघातात तरुण ठार

चोर्ला घाटात अपघातात 27 वर्षीय संकेत लोहार याचा मृत्यू. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याकडेला धडकली यात त्याचा मृत्यू झाला.

'गोवा फॉरवर्ड'चा बुधवारी डिचोलीत जनता दरबार..!

गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे बुधवारी डिचोलीत 'जनता दरबार'. पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई राहणार उपस्थित. डिचोलीसह सत्तरी तालुक्यातील जनतेची गाऱ्हाणी ऐकणार.

खनिज वाहतुकीविरोधात शेतकरी एकवटले..!

'वेदांता'च्या खनिज वाहतुकीस पिळगाव कोमुनिदाद आणि शेतकऱ्यांनी दंड थोपटले. आमच्या मालमत्तेतून बेकायदेशीरपणे घुसखोरी करून खनिज वाहतूक. कोमुनिदादीसह शेतकऱ्यांचा दावा. 'वेदांता विरोधात पोलीस तक्रार.

Goa Murder Case: कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी अखेर खूनाचा गुन्हा नोंद

कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी अखेर खूनाचा गुन्हा नोंद केला आहे. गळ्‍यावर आणि पोटावर तीक्ष्‍ण हत्‍यारांनी केलेले वार सापडूनही पोलिस गुन्हा नोंद का करत नाहीत यावरुन पोलिसांवर सवाल उपस्थित केले जात होते.

Goa Accident: न्हयबाग पोरस्कडे येथे चारचाकी व मालवाहू ट्रक यांच्यात अपघात

न्हयबाग पोरस्कडे येथे राष्ट्रीय महामार्ग 66 वर चारचाकी व मालवाहू ट्रक यांच्यात अपघात. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. कारचालक बचावला.

Theft Case: मोबाईल चोरीप्रकरणी बंगालच्या एकाला अटक

मोबाईल चोरी केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांकडून मोमिनुल मुल्ला (पश्चिम बंगाल) याला अटक.

आसगाव घर मोडतोड प्रकरण तपासात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप

आसगाव येथील आगरवाडेकर घर मोडतोडप्रकरणातील सुनावणी अपूर्ण राहिल्याने ती सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. पोलिस तपासकाम स्वतंत्रपणे होत नसून त्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा युक्तिवाद पूजा शर्मा हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीवेळी आज प्रधान सत्र न्यायालयात तिचे वकील सुरेंद्र देसाई यांनी केला. त्यांचा युक्तिवाद आज संपल्याने सरकारी वकील सोमवारी ८ रोजी बाजू मांडतील.

North Goa Police: उत्तर गोव्यातील सर्व पोलिस निरीक्षकांना 24 तास उपलब्ध राहण्याचे एसपींचे आदेश

उत्तर गोव्यातील सर्व पोलिस निरीक्षकांना चोवीस तास उपलब्ध राहण्याचे आदेश उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. बाहेर जायचे असल्याचे घ्यावी लागणार एसपींकडून पूर्व परवानागी.

Course: गोव्यात हॉस्पिटॅलिटी अँड हाऊस किपिंग कोर्स

हॉस्पिटॅलिटी अँड हाऊस किपिंग हे कोर्स 15 जुलैपासून सगळ्या आयटीमध्ये सुरुवात करीत आहोत हा कोर्स सहा महिन्याचा असेल आणि त्याचबरोबर त्यांना स्टाईपेंड देखील दिला जाईल - डॉक्टर प्रमोद सावंत

सावर्डे हायस्कूलमध्ये करिअर गायडन्स कार्यक्रम

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'स्वयंपूर्ण गोवा' या करिअर गायडन्स कार्यक्रमात सरकारी हायस्कूल सावर्डे, सत्तरी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

Theft In Temple: वाघुरे सत्तरी येथे मंदिरात चोरी

वाघुरे येथील श्री. व्याघेश्वर देवस्थानचा दरवाजा फोडून रोख रक्कम व देवस्थानच्या साहीत्याची चोरी. चोरीचा प्रकार रात्री घडल्याची शक्यता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT