Goa Breaking News Marathi  Dainik Gomantak
गोवा

Goa News: पुढील वर्षी 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 रोजी होण्याची शक्यता

Goa News Update: गोव्यातील राजकारण, गुन्हे, पर्यटन, कला - क्रीडा - संस्कृती यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी.

Pramod Yadav

पुढील वर्षी 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 रोजी होण्याची शक्यता

पुढील वर्षी 12 वीची परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 रोजी होण्याची शक्यता. तपशीलवार वेळापत्रक लवकरच सूचित केले जाईल : डॉ. भगीरथ शेट्ये, अध्यक्ष

मडकई सरपंच व उपसरपंचां विरोधात अविश्वास ठराव

सुदिन ढवळीकरांचा बालकिल्ला असलेल्या मडकई पंचायतीच्या सरपंच, उपसरपंच विरोधात अविश्वास ठराव. पंचायतीवर आहे ढवळीकरांच्या पॅनलची सत्ता.सरपंच शैलेंद्र पणजीकर आणि उपसरपंच संध्या नाईक यांच्या विरोधात ९ पैकी ५ पंच सदस्यांकडून अविश्वास ठराव. पंच सदस्यांमधील अंतर्गत राजकारणामुळे अविश्वास ठराव दाखल झाल्याची सुत्रांची माहिती.

गोवा बोर्डचा इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर

गोवा HSSC चा निकाल जाहीर, एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 90.64% आहे. एकूण 17,686 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. एकूण मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 92.42% आणि मुलांची 88.69% आहे.

गोव्यासाठी 29 मार्चसाठी यलो अलर्ट जारी

IMD ने 29 मार्च रोजी गोव्यासाठी यलो अलर्ट जारी केला. उत्तर आणि दक्षिण गोव्यात 30-40 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह गडगडाटी वादळाची शक्यता आहे.

कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये तीन तिकीट नसलेले प्रवासी पकडले

कोकण कन्या एक्स्प्रेसने मुंबई ते थिवी असा तिकीटविना प्रवास करणाऱ्या तीन तरुणांना ऑन ड्युटी टीटीईने पकडले. तपासणीदरम्यान ते तिकिटांशिवायच नव्हे तर दारूच्या नशेत टीटीईशी गैरवर्तन करताना आढळून आले. टीटीईने त्यांना आरपीएफकडे सुपूर्द केले, जिथे त्यांना रेल्वेच्या नियमांनुसार दंड ठोठावण्यात आला.

म्हाळशी कुर्टी येथे वन खात्याकडुन खैरीची झाडाचे कापलेले ओडके जप्त

म्हाळशी कुर्टी येथे वन खात्याकडुन खैरीची झाडाचे कापलेले ओडके जप्त.चार जणांना अटक.शस्त्रेही जप्त.एक रिक्षा व दोन दुचाकी जप्त तपास सुरु.

मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात मुरगावकडे विशेष लक्ष दिले- आमदार संकल्प आमोणकर

गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'स्वयंपूर्ण गोवा'साठी अतिरिक्त तरतूद केली. तसेच त्यांनी लोककेंद्रित अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा मुरगाव मतदारसंघाकडे विशेष लक्ष दिले. मुरगाव मतदारसंघासाठी 100 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद केली. याशिवाय, विविध मुरगावातील महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे आमदार संकल्प आमोणकर यांनी म्हटले.

“मी पक्षापुढे नतमस्तक” मंत्री बाबुश

गोव्याला प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत एकूण 62.62किलोमीटर लांबीचे वाटप

गोव्याला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSYII) अंतर्गत एकूण 62.62 किलोमीटर लांबीचा रस्ता वाटप करण्यात आला आहे. त्यानुसार, एकूण 70.0 किलोमीटर लांबीचे 11 रस्ते आणि 3 पुलांसह 14 प्रस्तावांना 126.0 कोटी रुपये खर्चाचा अंदाज राज्यस्तरीय स्थायी समितीने मंजूर केला आहे : आर्थिक पाहणी अहवाल

आमदार जीत आरोलकर यांनी दिली तुयेतील IDC कचरा प्लांटला भेट

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आणि सर्व पंचायतीचे सरपंच आणि पंच यांनी तुये येथील IDC कचरा प्लांटला भेट दिली आणि तपासणी केली.

गोवा प्रदेश महिला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा डॉ. प्रतीक्षा खलप यांनी घेतली पत्रकार परिषद

नवा मांडावी पूल १० दिवसांसाठी बंद; बघा व्हिडीओ

बारावीचा आज सायंकाळी पाच वाजता निकाल

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (27 मार्च) सायंकाळी पाच वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना  result.gbshsegoa.net  आणि  gbshse.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

नवा मांडवी पूल बंद! परिसरात मोठी वाहतूक कोंडी

नवा मांडवी पूल बंद केल्याने पणजीतून पर्वरीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.  नवा मांडवी पूल दुरुस्तीच्या कामासाठी २७ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या दहा दिवसांच्या काळात सर्व प्रकारची वाहतूक जुन्या पुलावरून वळवण्यात आली आहे.

Goa Accident: थिवी रेल्वे स्थानकाजवळ अपघात; दुचाकी चालक ठार

अस्नोडा, थिवी रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी अपघातात चालक ठार झाला आहे. अनिकेत बुगडे असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. अनिकेत इलेक्ट्रिक खांबाला धडकल्याने तो गंभीर जखमी झाला. म्हापसा येथील रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT