आगलोत-साकोर्डा येथील सर्व्हे क्रमांक 114/1 या वन विभागाच्या जागेत बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या चिरे खाणीवर गुरुवारी (14 ऑगस्ट) संध्याकाळी खाण विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. खाण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कुळे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्या वर्षीही याच जागेवर बेकायदेशीरपणे चिरे खाण सुरु असल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातून पुन्हा एकदा वन विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन सुरु असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या आरोपाखाली फोंडा पालिकेचे नगरसेवक शिवानंद सावंत यांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. यापूर्वीही याच प्रकरणात त्यांना अटक झाली होती. फोंडा पोलिसांनी ही कारवाई केली असून, पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बनावट कागदपत्रे तयार करुन काही जमीन व्यवहार केल्याचा आरोप सावंत यांच्यावर आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या घटनेमुळे फोंडा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
राज्यात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर होणाऱ्या रोड शो आणि मिरवणुकांमुळे वाहतुकीची समस्या वाढत आहे. विशेषतः काणकोणमधील स्थानिक महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी निवडणूक निकालानंतर केलेल्या मिरवणुकीत वाहतुकीचे नियम आणि कायदे धाब्यावर बसवले. यामुळे सामान्य वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला होता.
गोवा हवामान खात्याच्या वेधशाळेने राज्यात पाच दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. आज देखील (१५ ऑगस्ट) राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून, पुढील पाच दिवस म्हणजेच २० ऑगस्टपर्यंत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर तत्कालिन कला, संस्कृती आणि क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री सावंत यांना विचारले असता काही निर्णय पक्ष आणि राज्यासाठी घ्यावे लागतात असे स्पष्ट केले. पण, गोविंद गावडे अजूनही माझे मित्र असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
गोव्याला भारतापेक्षा १४ उशीराने स्वातंत्र्य मिळाले पण, इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. पायाभूत सुविधा, आरोग्य क्षेत्र, शिक्षण आणि इतर क्षेत्रात गोव्याने चांगला विकास केला आहे, असे वक्तव्य समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात केले.
पणजी महानगरपालिकेसमोर आयुक्त क्लेन मेदेरा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त आज सकाळी ध्वजरोहण करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक, महानगरपालिकेचे आणि सरकारी खात्यातील कर्मचारी उपस्थित होते.
अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागाने अन्न पदार्थातील भेसळीविरोधात मोले चेक पोस्ट येथे छापा टाकुन मोठी कारवाई करत कर्नाटक राज्यातुन गोव्यात येणारे पदार्थ ताब्यात घेतले. पुढील तपास अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागचे अधिकारी श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनखाली दक्षीण गोवा संज्योत कुडाळकर तपास करीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.