Goa to Nepal bus accident Dainik Gomantak
गोवा

Bhudargad Accident: गोव्याहून नेपाळकडे जाणाऱ्या बसचा अपघात! चालकाचे नियंत्रण जाऊन घुसली शेतात; 2 प्रवासी गंभीर जखमी

Goa to Nepal bus accident: पिंपळगाव (ता. भुदरगड) गावाजवळील रस्त्यावरून जात असताना ही बस नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या शेतात जाऊन एका झाडावर जोरदार आदळली.

Sameer Panditrao

कोल्हापूर: गोव्याहून नेपाळकडे जाणाऱ्या बसचा पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. पिंपळगाव (ता. भुदरगड) गावाजवळील रस्त्यावरून जात असताना ही बस नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या शेतात जाऊन एका झाडावर जोरदार आदळली.

बसमध्ये सुमारे ५० नेपाळी प्रवासी होते. अपघातात बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अचानक झालेल्या या गोंधळामुळे प्रवासी घाबरून गेले. अपघातानंतर ते जवळच्या शेतात बसून मदतीसाठी लोकांची वाट पाहत होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून बसमधील सर्व प्रवाशांकडून माहिती घेतली.

स्थानिक रहिवाशांनी अपघातग्रस्त प्रवाशांना मदतीसाठी धाव घेतली. सध्या या अपघाताची कारणे तपासली जात आहेत. स्थानिक प्रशासनाने रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT