वनमहोत्सव कार्यक्रमानिमित्ताने विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करताना पाहुणे नकुळ म्हामल सोबत प्रकाश मुचंडी, कृष्णा तळवणेकर, मुख्याध्यापिका मिनी पी.एस , महादेव गवंडी, कृष्णा तळवणेकर व इतर शिक्षक Dainik Gomantak
गोवा

Goa: पर्यावणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावून ती जगविणे गरजेचे

विकासाच्या नावाने मोठ्या प्रमाणात निसर्गाचा -हास होताना दिसत आहे. मोपा विमानतळ ,औद्योगिक वसाहत यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे.यामुळे प्राणवायूची समस्या भविष्यात भेडसावणार आहे.

दैनिक गोमन्तक

मोरजी: पर्यावरणाचा (environment) समतोल राखण्यासाठी आज झाडे (Trees) लावण्याची गरज असून लावलेली झाडे जगणे व त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रज्ञा हायस्कूलचे चेअरमन (Pragya High School Chairman Nakul Mhamal) नकुळ म्हामल यांनी देवसू येथे वनमहोत्सव (Forest Festival) कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले.

प्रज्ञा हायस्कूल देवसू यांच्या वतीने आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आॕनलाईन गुगल मीट वनमहोत्सव कार्यक्रमात यावेळी व्यासपीठावर हायस्कूलचे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष महादेव गवंडी , संस्थेचे सदस्य कृष्णा तळवणेकर, मुख्याध्यापिका मिनी पी.एस , मॕनेजर प्रकाश मुचंडी, ज्येष्ठ चंदा हरमलकर, सिद्धी नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना नकुळ म्हामल पुढे म्हणाले , आज सर्वत्र विविध क्षेञांचा विकास होत आहे. हा विकास होत असताना वाढते प्रदुषण , वाढती लोकसंख्या याचा परिणाम निसर्गावर मोठ्या प्रमाणात होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसार्गाचे संवर्धन होणे ही काळची गरज असून तसे न झाल्यास भविष्यात वाईट परिणामाना सर्वांना सामोरे जावे लागणार आहे.

विकासाच्या नावावर पर्यावरणाचा -हासः महदेव गवंडी

यावेळी बोलताना पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष महादेव गवंडी म्हणाले , आज विकासाच्या नावाने मोठ्या प्रमाणात निसर्गाचा -हास होताना दिसत आहे. मोपा विमानतळ ,औद्योगिक वसाहत यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे.यामुळे प्राणवायूची समस्या भविष्यात भेडसावणार आहे. सरकार आणि विविधा संस्था यांच्यावातीने वनमहोत्सव साजरे केले जात असून निसर्गाचे संवर्धन होण्यासाठी लावलेली झाडे यांचे संगोपन हे आपल्या मुलासारखे करण्याची गरज असून ते झाल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल असे म्हणाले.

यावेळी सुरुवातीला आॕनलाईन गुगलमीटच्या माध्यमातून विद्यालयांच्या शिकक्षांनी पर्यावराणाचे महत्व विशद करणारे स्वागतगीत सादर केले.

प्राथमिक विभागातील इशान नंदकिशोर देऊस्कर व दिया जोशी व दिशा जोशी या विद्यार्थ्यांनी झाडांचे महत्व विशद करणारी गीते सादर केली.

कु.सिदार्थ धुपकर, मनिष गवंडी , कृतिका कासकर, सलोनी नारोजी, वेदिका कवठणकर व मनाली पार्सेकर या विद्यार्थ्यांनी वनमहोत्सवाबाबत आपल्या भाषणातून झाडे लावण्याचे आवाहन केले.

शिक्षिका रिमा मालवणकर यांनी वनमहोत्सव दिन साजरा केव्हा पासून झाला तृसेच झाडांचे महत्त्व यांची माहिती दिली. प्रास्तविक व स्वागत शिक्षक प्रमोद गवंडी यांनी केले. सूञसंचालन शिक्षिका सिद्धी नाईक यांनी केले तर आभार शिक्षिका हर्षा जोशी यांनी मानले.

यावेळी पाहुणे नकुळ म्हामल , प्रकाश मुचंडी, कृष्णा तळवणेकर, रोहिदास भाटलेकर आदीच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT