Goa Made Liquor Smuggling Dainik Gomantak
गोवा

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa - Karnataka Border: तपासणीत ७०० गोवा बनावटीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारुची किंमत १२ लाख रुपये असल्याची माहिती आहे.

Pramod Yadav

खानापूर: गोव्यातून शेजारच्या कर्नाटक आणि महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे मद्य वाहतुकीचे अनेक प्रकार समोर येत असतात. गोव्यातून कर्नाटकात अवैध पद्धतीने मद्य तस्करी करण्याचा प्रयत्न अबकारी खात्याने उधळून लावला. लाकडाच्या भुशातून मद्याची वाहतूक केली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटकच्या वाहनाला गोवा पासिंगची नंबरप्लेट लावून तस्करी करण्याचा प्रयत्न केला जात होता.

मद्य तस्करीप्रकरणी मंजुनाथ बुद्धिहाळ (रा. बेळगाव) याला अटक करण्यात आली आहे. तसेच, आयशर पिकअप वाहन (जीए ०७ एन २६२९) जप्त करण्यात आले आहे. अबकारी खात्याने १२ लाखांचे मद्य आणि २० लाखांचे वाहन असा एकूण ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले मद्य सुमारे तिप्पट किंमतीने विक्री केले जाणार होते.

 मिळालेल्या माहितीनुसार, आयशर पिकअप चोर्लामार्गे बेळगावला जात होते. अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना या वाहनावर संशय आल्याने केरी तपासणी नाक्यावर तपासणी करण्यात आली.

अधिकाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात लाकडाचा भुसा आणि त्या आडून विदेशी मद्य लपविण्यात आल्याचे आढळून आले. तपासणीत ७०० गोवा बनावटीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारुची किंमत १२ लाख रुपये असल्याची माहिती आहे.

लाकडाचा भुसा आणि कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट

तस्करीसाठी अटक करण्यात आलेल्या संशयिताने शक्कल लढवली होती. आयशरमध्ये लाकडाच्या भुशा अडून मद्य लपविण्यात आले होते. एवढेच नव्हे तर वाहन कर्नाटकचे असताना देखील त्याला गोव्याच्या गाडीचे नंबरप्लेट लावण्यात आले होती. अधिकाऱ्यांनी संशयिताला अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT