इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) सोबतच, गोवा आता जगातील पहिल्या ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (WAVES) चे आयोजन करणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ही घोषणा केली.
20 ते 24 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात ही शिखर परिषद होणार आहे. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल. मुरुगनही उपस्थित होते.
"प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन विश्व संरचनात्मक बदलातून जात असून तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर समावेश होताना दिसत आहे. या क्षेत्रात उदयास येत असलेल्या नवीन संधी आणि नवीन बदलांची आव्हाने यांच्याशी ताळमेळ राखणे अत्यंत आवश्यक आहे. या बदलाला सामोरे जाण्यासाठी मीडिया आणि मनोरंजनाच्या संपूर्ण परिसंस्थेला पाठिंबा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे", असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या भाषणात म्हणाले.
यावेळी Waves ची वेबसाइट लाँच करताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ.एल. मुरुगन म्हणाले की, Waves 2024 ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन उद्योगातील जागतिक प्रतिनिधींना भारतात आणण्याचा प्रयत्न आहे. या समिटमुळे देशातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण होईल.
इफ्फी दीर्घकाळापासून सिनेमॅटिक उत्कृष्टतेचे प्रतीक आहे, तर WAVES उदयोन्मुख मनोरंजन विश्वावर लक्ष केंद्रित करून उद्योग सहकार्याचा एक नवीन आयाम सादर करेल. तसेच WAVES गोव्याला सांस्कृतिक केंद्र म्हणून स्थापित करेल, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
भारताचा आर्थिक विकास होत असताना भारताच्या सॉफ्ट पॉवरला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश असल्याचे सचिव संजय जाजू यांनी सांगितले. सृजनशीलता, नावीन्य आणि परिणामकारकता यांमध्ये हे शिखर समिट जगात नवे मापदंड प्रस्थापित करेल.
नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीला चालना देणे, उद्योगाची जागतिक स्पर्धात्मकता वाढवणे, उद्योग सहकार्य मजबूत करणे, गुंतवणूक आकर्षित करणे, कौशल्य विकासाला चालना देणे या उद्देशांना साध्य करण्यासाठी शिखर परिषद काम करेल, असेही जाजू म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.