Special Train: मडगाव ते चंदीगड! गोव्यातून धावली नवी विशेष ट्रेन, चार राज्यात थांबा

Madgaon to Chandigarh Special Train: ट्रेन क्रमांक 02449 ही मडगाव ते चंदीगड दरम्यान धावणारी एकेरी विशेष ट्रेन आहे.
मडगाव ते चंदीगड! गोव्यातून धावणार नवी विशेष ट्रेन
Madgaon to Chandigarh Special TrainDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील मडगाव ते चंदीगड दरम्यान एकेरी विशेष ट्रेन सुरु करण्यात आली आहे. ही ट्रेन राजस्थानमधील कोटा येथून धावेल. या मार्गावरील प्रवाशांची मोठी संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोटा विभागाच्या अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 02449 ही मडगाव ते चंदीगड दरम्यान धावणारी एकेरी विशेष ट्रेन आहे. मडगाव येथून 12 जुलै रोजी सकाळी 9:40 वाजता ही ट्रेन रवाना झाली असून, 14 जुलै रोजी सकाळी 8:10 च्या सुमारास कोटा येथे पोहोचेल. त्याच दिवशी संध्याकाळी 6.25 वाजता चंदीगडला पोहोचेल.

समोर आलेल्या माहितीनुसार, या विशेष ट्रेनमध्ये विविध श्रेणींचे एकूण 22 एलएचबी कोच बसवण्यात आले आहेत. ही गाडी करमळी, थिवी, पेडणे, रत्नागिरी, रोहा, पनवेल, वसई रोड, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, हजरत निजामुद्दीन, नवी दिल्ली, पानिपत आणि अंबाला स्थानकावर थांबेल.

मडगाव ते चंदीगड दरम्यानच्या विशेष ट्रेनमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे. सध्या ही ट्रेन चाचणी स्वरुपात सुरू करण्यात आली असून, यातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाईल.

मडगाव ते चंदीगड! गोव्यातून धावणार नवी विशेष ट्रेन
Anant & Radhika Wedding: अनंत-राधिकाच्या शाही विवाह सोहळ्यात गोवन फूडचा जलवा; शेफ अविनाश मार्टिन्स यांनी तयार केला खास मेन्यू

दुसरीकडे, पश्चिम रेल्वेने वापी-दानापूर-भेस्तानदरम्यान तीन-साप्ताहिक विशेष ट्रेनची वारंवारता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबाबत शुक्रवारी प्रसिद्धीपत्रक जारी केले.

पश्चिम रेल्वेने ट्रेन क्रमांक 09063/09064 वापी-दानापूर-भेस्तान या त्रिसाप्ताहिक विशेष गाडीसाठी विशेष भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 09063 वापी-दानापूर स्पेशल 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 09064 दानापूर-भेस्तान स्पेशल 2 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही गाडी उधना, किम, भरूच, वडोदरा, गोध्रा, दाहोद, रतलाम, नागदा, उज्जैन, संत हिरडाराम नगर, बिना, दामोह, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, छिवकी, पं उपाध्याय, बक्सर आणि आरा स्थानकांवर थांबतील. ट्रेन क्रमांक 09063 ला वलसाड, नवसारी आणि भेस्तान स्थानकांवर अतिरिक्त थांबा असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com