Union Budget 2022 For Goa Dainik Gomantak
गोवा

Union Budget 2022 For Goa: अर्थसंकल्पात गोव्याला मिळणार 3152.25 कोटी!

गेल्यावर्षीपेक्षा 281 कोटी जास्त

दैनिक गोमन्तक

Union Budget 2022 For Goa (अजय बुवा): केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेल्या 2022-23 च्या अर्थसंकल्पात गोव्याच्या विकासात अधिक भर दिली आहे. केंद्राकडून वसूल होणाऱ्या वेगवेगळ्या करांमधून गोव्याला लोकसंख्येच्या प्रमाणात (0.386 टक्के रक्कम) निधी (Goa Budget) मिळेल, अशी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे गोव्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प लाभदायक आहे.

गोव्यासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार 2022-23 मध्ये 3152.25 कोटी रुपये गोव्याला मिळतील. 2021-22 च्या (मावळते आर्थिक वर्ष) मिळालेली रक्कम 2870.39 कोटी रुपये होती. ती यावर्षी वाढविण्यात आली आहे.

नव्या आर्थिक वर्षात गोव्याला केंद्राकडून कॉर्पोरेशन करातून 984.26 कोटी, प्राप्ती करातून 950.58 कोटी, केंद्रीय जीएसटीतून 1035.05 कोटी, उत्पादन शुल्कातून 136.37 कोटी, अबकारी शुल्कातून 42.57 कोटी आणि सेवा करातून 3.16 कोटी रुपये मिळतील.

पर्यटनासाठी 2400 कोटी

अर्थसंकल्पात देशभरातील पर्यटनासाठी (Tourism) 2400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी 1644 कोटी रुपये पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि 421.50 कोटी प्रचारात्मक उपक्रमांसाठी असतील.

प्रमुख पर्यटन पायाभूत सुविधांच्या योजनांसाठी अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी 1181.30 कोटी स्वदेश दर्शन योजनेसाठी आणि 235 कोटी रुपये तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि अध्यात्मिक, हेरिटेज प्रमोशन कॅम्पेन (प्रसाद) योजनेसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT