किनारपट्टी dainikgomantak
गोवा

Goa: गोव्यात 17 सप्टेंबरला किनारपट्टी स्वच्छता दिवस, 5 बीचवर केली जाणार स्वच्छता

मिरामार, बायणा, कोलवा, बोगमाळो आणि वेळसाव हे पाच बीच या स्वच्छता मोहिमेचे भाग आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा सरकार 17 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस (International Coastal Clean-up Day) म्हणून साजरा करणार आहे. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत गोव्यातील तब्बल 37 बीच स्वच्छ केले जाणार आहेत. मिरामार, कळंगुट आणि कोलवा (Miramar, Calangute And Colva) या बीचवर मुख्य कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. मिरामार येथील स्वच्छता मोहिम मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या नेतृत्वाखाली पार पडेल.

पर्यटन मंत्री रोहण खंवटे कळंगुट आणि पर्यावरण मंत्री निलेश काब्राल हे कोलवा येथील स्वच्छता मोहिमेत सहभागी होतील. सागरी किनारे स्वच्छता मोहिम ही आंतरराष्ट्रीय मोहिम असून, भारत सरकराने गोव्यातील पाच बीच यासाठी निवडले आहेत. मिरामार, बायणा, कोलवा, बोगमाळो आणि वेळसाव (Bogmalo, Baina And Velsao) हे पाच बीच या स्वच्छता मोहिमेचे भाग आहेत. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत या स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

"स्वच्छ सागर, सुरक्षित सागर / स्वच्छ किनारा सुरक्षित सागर" ही मोहिम सागरी स्वच्छतेची नागरीकांच्या नेतृत्वाखालील 75 दिवसांची मोहिम आहे. 5 जुलै 2022 रोजी ही मोहिम सुरू झाली. या मोहिमेची तीन मूलभूत उद्दिष्टे आहेत, वस्तूंचा जबाबदारीने वापर, घरातील कचऱ्याचे वर्गीकरण आणि त्याची जबाबदारीने विल्हेवाट लावणे.

राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केन्द्र (एनसीपीओआर) आणि मुरगाव बंदर प्राधिकरण (एमपीए), विज्ञान प्रसार आणि दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालय यांनी स्वच्छ सागर सुरक्षित सागर (स्वच्छ किनारा, सुरक्षित किनारा) मोहिमे अंतर्गत मुरगाव येथे गुरुवार, 8 सप्टेंबर 2022 रोजी जनजागृती मोहिमेचे आयोजन केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा झालं महाग! पर्यटनाच्या नावाखाली लूट, 'कचऱ्याचे ढिग' आणि 'टॅक्सीवाल्यांची दादागिरी', पर्यटकाने शेअर केला धक्कादायक अनुभव

पिर्णा हत्या प्रकरण 15 तासांत उलगडले; कांदोळीतील मुख्य आरोपीला अटक

18 गुन्ह्यांचा रेकॉर्ड! गोवा-पुणे महामार्गावर 8 लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश; पोलिसांच्या वेशातील 'सराईत गुन्हेगार' जेरबंद

Valpoi Theft: ना CCTV, ना सेक्युरिटी, चोरट्यांनी गॅस कटरनं तोडली खिडकी; वाळपई पोस्ट ऑफिसमधून लाखो रुपये लंपास

'मी अशा पुरुषाच्या शोधात’; ऑनलाईन अश्लील जाहिरातीला बळी पडला अन् लाखो रुपये गमावले

SCROLL FOR NEXT