Kotitirth Corridor project Goa
पणजी: दिवाडी बेटावर श्री देव सप्तकोटेश्वरच्या मूळ स्थानावर बुधवारी (१० सप्टेंबर) राज्य सरकार स्मारक मंदिर उभारणार आहे. पोर्तुगीज काळात पाडण्यात आलेल्या सर्व मंदिरांची स्मृति जपण्यासाठी हे मंदिर असेल. कोटीतिर्थ कॉरिडॉर या नावाने हा प्रकल्प राज्य सरकार राबवणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
मंदिराचे स्वरूप आणि इतर तपशील अद्याप ठरायचा असल्याचे त्यांनी सांगितले. पुरातत्व खात्याने नेमलेल्या समितीच्या शिफारशीनुसार हे मंदिर दिवाडी येथेच पुरातत्व खात्याकडे उपलब्ध असलेल्या दहा हजार चौरस मीटर जमिनीत उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोव्यातील पुर्तुगीज काळात पाडण्यात आलेल्या मंदिरांचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने पाच सदस्य समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला होता.
या अहवालात सुमारे १,०००हून अधिक मंदिरे व देवस्थाने नष्ट झाली असल्याचे नमूद करण्यात आले असून, सर्वांची पुनर्बाधणी करणे व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर समितीने “स्मारक देवालय" तसेच संग्रहालय उभारण्याची शिफारस केली होती.
गोव्याच्या या सांस्कृतिक वारशाचे स्मरण व संवर्धन भावी पिढ्यांसाठी होण्यासाठी स्मारक मंदिर आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले होते.
अहवालातील मुख्य मुद्दे
१) पोर्तुगीज काळात तिसवाडी, बार्देश व सासष्टी तालुक्यातील मंदिरे सर्वाधिक प्रमाणात नष्ट झाली.
२) सर्व मंदिरांचे पुनर्निर्माण शक्य नाही; मात्र दिवाडी येथील सप्तकोटेश्वर मंदिर पुनर्बाधणीस योग्य असल्याची नोंद.
३) प्रतीकात्मक स्मारक व संग्रहालय उभारून नष्ट झालेल्या मंदिरांचा इतिहास, पुरावे व शिलालेख प्रदर्शित करावेत.
४) संशोधन व पुरातत्व अभ्यासाला चालना देण्यासाठी स्थानिक व अकादमिक तज्ज्ञांना सहभागी करून घ्यावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.