goa tiger reserve case Dainik Gomantak
गोवा

Goa Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पाचा पेच सर्वोच्च न्यायालयात, 'आदेश सर्वांना बंधनकारक'; वनमंत्री राणेंची माहिती

Tiger project Goa issue: या संदर्भात सर्वोच्च न्यायालय जो काही आदेश देईल, तो सर्वांना बंधनकारक असेल

Akshata Chhatre

पणजी: केंद्रीय सक्षम समितीने (CEC) केलेल्या शिफारशीनुसार गोव्यात व्याघ्र प्रकल्प अधिसूचित करण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना वनमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले आहे की, या संदर्भात सर्वोच्च न्यायालय जो काही आदेश देईल, तो सर्वांना बंधनकारक असेल. त्याचबरोबर, या प्रकरणी सरकार आपले म्हणणे मांडण्यासाठी उपलब्ध असलेली सर्व न्यायालयीन आयुधे वापरेल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

सीईसीच्या अहवालात 'या' भागांचा समावेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने 'राज्यात व्याघ्र प्रकल्प अधिसूचित करा' असा आदेश दिल्यानंतर, राज्य सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा विषय केंद्रीय सक्षम समितीकडे सोपवला होता. केंद्रीय सक्षम समितीने (CEC) दिलेल्या अहवालात महावीर अभयारण्याचा दक्षिणेकडील भाग, महावीर राष्ट्रीय उद्यान, नेत्रावळी अभयारण्य आणि खोतिगाव अभयारण्य मिळून व्याघ्र प्रकल्प तयार करण्याची शिफारस केली आहे.

'मुख्यमंत्री आणि ॲडव्होकेट जनरल आधी बोलतील'

व्याघ्र प्रकल्पाच्या शिफारशीवर आमदार तथा गोवा वन महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. देविया राणे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. देविया राणे म्हणाल्या की, "यासाठी एक प्रोटोकॉल ठरलेला आहे आणि आमच्याकडे एक उतरंड (Hierarchy) आहे. सर्वप्रथम मुख्यमंत्री, वनमंत्री आणि ॲडव्होकेट जनरल त्यांचे मत मांडतील, त्यानंतरच आम्ही यावर भाष्य करू."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina Dacoity: बायणा दरोड्याचा सूत्रधार भेळपुरीवाला! महाराष्ट्र, ओडिशातून 6 संशयितांना अटक

Goa Politics: 'मी चाललोय, काहीतरी रंजक घडेल!',आरजीच्या पाठोपाठ पालेकरांची दिल्लीवारी; Watch Video

अग्रलेख: '...आंबेडकरांच्या 'संघराज्या'च्या व्याख्येने गोव्याला दिली वेगळी ओळख!

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

SCROLL FOR NEXT