Goa-Thiruvananthapuram Train Robbery Case  Dainik Gomantak
गोवा

युपी टु गोवा, तिरुअनंतपुरम ट्रेनमध्ये दरोडा टाकून करायचे पलायन; मिर्झापूरच्या दोघांना अटक

Goa-Thiruvananthapuram Train Robbery Case: दोघांकडून सोने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

Pramod Yadav

Goa-Thiruvananthapuram Train Robbery Case: गोवा-तिरुअनंतपुरम रेल्वे मार्गावर रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोघांना अटक करण्यात आलीय. चोरटे मंगळुरू लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून चोरी करायचे, मंगळुरू रेल्वे स्थानकावर दोघांना अटक करण्यात आली.

मंगळुरू पोलिसांनी अभय राजसिंग आणि हरिशंकर गिरी (रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सोने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

गोवा-तिरुवनंतपुरम रेल्वे मार्गावर गेल्या दोन आठवड्यांत काही दरोडे पडले. अनेकांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गमावली, अशी माहिती आरपीएफ अधिकाऱ्याने तेथील एका स्थानिक वृत्तपत्राला दिली.

चोरीच्या घटना समोर आल्यानंतर पलक्कड आरपीएफच्या गुन्हे गुप्तचर शाखा आणि मंगळुरू जंक्शन आरपीएफ विशेष पथकाने संयुक्तपणे तपासाला सुरुवात केली. यात दोघांना अटक करण्यात आलीय.

अशी होती मोडस ऑपरेन्डी

दोघेही उत्तर प्रदेशातून गोव्याला यायचे आणि तिरुअनंतपुरमला ट्रेनमध्ये चढायचे. प्रवाशांना लुटायचे आणि पुन्हा उत्तर प्रदेशला जाण्यापूर्वी ट्रेनमधून गोव्याला परतायचे.

दोघे रात्री जागे असलेल्या प्रवाशांकडून सोने आणि पैसा हिसकावयचे. या दोघांनी देशात इतरत्रही असेच गुन्हे केले आहेत. त्यांना मंगळुरू आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले आहे, असे आरपीएफ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

Goa Live News: गोवा पोलिसांनी मिळवून दिला रशियन पर्यटकाचा हरवलेला पासपोर्ट

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

SCROLL FOR NEXT