Goa: CM Dr. Pramod Sawant Innogerating Function In Betki. Dainik Gomantak
गोवा

Goa: बेतकीत होणार कम्युनिटी हेल्थ सेंटर

Goa: डॉ. प्रमोद सावंत : मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन प्रकल्पाचा शिलान्यास

Sanjay Ghugretkar

खांडोळा : बेतकी आरोग्य केंद्राची कार्यकक्षा मोठी असल्याने आरोग्यसेवांतही वाढ होण्याची आवश्यकता आहे. हे केंद्र आता कम्युनिटी हेल्थ सेंटर होईल, अशी माहिती डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Dr. Pramod Sawant) यांनी बेतकी आरोग्य केंद्राच्या नूतन इमारत प्रकल्पाच्या शिलान्यासप्रसंगी दिली.

यावेळी व्यासपीठावर आरोग्य मंत्री विश्वजित राणे, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, आरोग्य सेवा विभागाचे संचालक डॉ. ज्‍योस डिसा, आरोग्याधिकारी डॉ. ब्रॅंडा पिंटो, जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, सिद्धेश नाईक, प्रिया च्यारी, स्थानिक सरपंच उपस्थित होते.

नूतन प्रकल्पाचा शिलान्यास, नामफलकाचे अनावरण झाल्यानंतर मुख्‍यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, आपले सरकार हे तळागाळातील जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. सरकारची प्रत्येक योजना गावागावात, प्रत्येक घरापर्यंत पोचविण्यात येत आहे. दीनदयाळ स्वास्‍थ्‍य योजनेचे कार्य तसेच कोविड काळातील आरोग्य खात्याचे कार्य उत्तम प्रकारे सुरू आहे. सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच टेलिमेडिसीन योजना सुरू होईल. कोविड अद्याप संपला नाही, तिसरी लाट केव्हा येईल, हे सांगता येत नाही. आपण सज्ज राहिले पाहिजे. प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

मंत्री राणे म्हणाले, की आरोग्य सेवेत गोवा अव्वल असून, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार विविध योजना यशस्वी होत आहेत. राज्यातील आरोग्य सेवेत वाढ होत आहे. राज्यातील हेल्थ सेंटर्स सक्षम होत असून, डायलिसिस सुविधा, हृदयविकारासंबंधी खास रुग्णवाहिका हेल्थ सेंटरमध्ये उपलब्ध होत आहेत. भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आरोग्य केंद्रात उपलब्ध होणार आहे. त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

मंत्री गावडे म्हणाले, प्रियोळ मतदारसंघाचा चौफेर विकास करण्याचे ध्येय निश्चित करून गेल्या साडेचार वर्षांत विविध सोयीसुविधा जनतेच्या सहकार्याने राबविल्या. उत्तम आरोग्य सुविधांसाठी आरोग्य केंद्राचे नूतनीकरण करणे, सुसज्ज इमारत बांधणे गरजेचे होते. तेही स्वप्न पूर्ण होत आहे. सुनियोजितपणे हेल्थ सेंटरचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

आरोग्याधिकारी डॉ. ब्रॅंडा पिंटो यांनी प्रास्ताविक केले. सर्वेंद्र फडते यांनी सूत्रसंचालन केले. बेतकी-खांडोळ्याचे सरपंच दिलीप नाईक यांनी आभार मानले.

उद्‍घाटन आम्हीच करणार!

बेतकी आरोग्य केंद्राचा प्रकल्प ३० कोटी रुपयांचा असून, केवळ १८ महिन्यांत ते पूर्ण होणार आहे. तेव्हा उद्‍घाटनाला माझ्यासह व्यासपीठावरील कला व संस्‍कृती मंत्री गोविंद गावडे, आरोग्य मंत्री विश्वजित राणे व इतर सर्व मान्यवर आपण सर्वजण उपस्थित राहणार आहोत, असा आशावाद मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT