MGP Leader Sudin Dhavalikar in Assembly. (Goa)
MGP Leader Sudin Dhavalikar in Assembly. (Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: कर्नाटकातील कोणत्या धरणाचे पाणी गोव्यात आले; ढवळीकरांचा सरकारला प्रश्न

नरेंद्र तारी

फोंडा - पाणी अचानक कसे वाढले, कर्नाटकातील (Karnataka) कुठल्या धरणातून हे पाणी लोकांना कोणतीही सूचना न देता सोडले याची चौकशी सरकारने (Goa Govt.) निवृत न्यायाधिशांमार्फत निष्पक्षपातीपणे करावी, अशी मागणी मगोप चे नेते (MGP Leader) तथा आमदार सुदिन ढवळीकर (MLA Sudin Dhavalikar) यांनी केली. पाणी कसे वाढले, याची शहानिशा आताच झाली नाही तर दर पावसाळयात पुराची (Flood) टांगती तलवार किनारपट्टी भागाराहणाऱ्या लोकांवर कायम राहील. या महापुरात सरकारची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे अपयशी पडली (failure of Disaster management), असा आरोप सुदिन ढवळीकर यांनी सरकारवर केला (MGP GOA).

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या प्रमुखाने त्वरित स्वतःची जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा.अशी मागणी देखील ढवळीकर यांनी केली. महापुरावेळी आपण गोव्याबाहेर असल्याने स्वतः घटनास्थळी पोचलो नाही, पण मगो कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना करून मदतीसाठी प्रयत्न केले. सद्यस्थितीत सरकारकडून तात्काळ आर्थिक मदत व्हायला हवी होती पण ती दिली गेली नाही, सरकारकडून फक्त आशवासनेच झाली. गोव्याचे सरकार निद्रिस्त अवस्थेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ढवळीकर ट्रस्ट तर्फे (Dhavalikar Trust) प्रत्येक ठिकाणी गरजेप्रमाणे किमान तीन घरे उभी केली जाणार, अशी ग्वाही देखील ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. (Goa)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

SSC Result 2024 : पेडणे तालुक्यातील ३२ पैकी १५ शाळांचा निकाल १०० टक्के

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

E-Vehicle : ई-वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ; दरमहा ८२४ वाहनांची नोंद

SCROLL FOR NEXT