Sanguem Market Dainik Gomantak
गोवा

Sanguem: सांगे बाजार परिसरातील पार्किंग समस्या जटिल, वाहनचालक हैराण; पार्किंग सुविधा उभारण्यास पालिकेला अपयश

Sanguem Market: सांगे येथील पार्किंग समस्या जटिल होत चालली आहे. बाजार व सरकारी कार्यालये एकाच ठिकाणी असल्यामुळे तसेच छोटा बस स्थानकाही येथे असल्याने वाहनाची मोठी गर्दी होते.

गोमन्तक डिजिटल टीम

सांगे येथील पार्किंग समस्या जटिल होत चालली आहे. बाजार व सरकारी कार्यालये एकाच ठिकाणी असल्यामुळे तसेच छोटा बस स्थानकाही येथे असल्याने वाहनाची मोठी गर्दी होते. त्यामुळे बसस्थानकावरील पार्किंगची जागा अपुरी पडत आहे. पालिकेला ही समस्या सोडविण्यास अद्याप यश आलेले नाही, यामुळे वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत.

बस स्थानकाच्या चारी बाजूने दुकाने तसेच मागे सरकारी कार्यालये असल्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते. गाड्या पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने अनेकजण कुठेही वाहने उभी करतात, त्यामुळे समस्येत अधिक भर पडते. त्यात बसस्थानकावर प्रवासी बसगाड्या कशाही उभ्या केल्या जातात. काही गाड्या तासन्तास पार्क करून ठेवल्या जातात.

येथील चार चाकी व दुचाकी पार्किंग अशी सोय केली असली तरी ही जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे बसस्थानकावर तासन्तास जागा अडवणाऱ्या बसगाड्यांना अन्यत्र हलवण्यात याव्यात. तसेच फक्त पाच मिनिटेच बसगाडीला थांबा घेण्यास मुभा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे अन्य वाहनांना काही प्रमाणात पार्किंगसाठी जागा उपलब्ध होऊ शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

पालिकेकडे पार्किंगसाठी स्वतंत्र जागा नाही. वाढत्या वाहनांमुळे छोट्या बस स्थानकातील जागाही अपुरी पडत आहे. पालिकेने याबाबत आता गंभीरपणे विचार करणे आवश्‍यक आहे, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT