Goa Police Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime: कळंगुटमध्ये रात्रंदिवस पोलिसांचा जागता पहारा; बिघडलेली कायदा-सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न!

Goa Police: कळंगुटमधील नाईट क्लब तसेच डान्स बारमुळे गेले अनेक दिवस या भागात बिघडलेली कायदा तसेच सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी स्थानिक पोलिस यंत्रणा सज्ज झाली.

Manish Jadhav

कळंगुट: कळंगुटमधील नाईट क्लब तसेच डान्स बारमुळे गेले अनेक दिवस या भागात बिघडलेली कायदा तसेच सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी स्थानिक पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून या भागातील नाक्या- नाक्यांवर तसेच प्रमुख जंक्शनवर दिवसा व रात्रीची गस्त सुरु करण्यात आली आहे.

कळंगुटमध्ये येणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहणे तसेच पर्यटक टॅक्सी आणि भाडेपट्टीवर चालणाऱ्या वाहनांची उत्तरेकडील हडफडे जंक्शनवर, तर पूर्वेकडून येणाऱ्या वाहनांची नेरुल पूल तसेच साळगाव येथील चर्चसमोरच्या मुख्य रस्त्यावर आणि कळंगुट येथील सेंट आलेक्स चर्च परिसरात तपासणी केली जात आहे. यावेळी पोलिसांकडून बेकायदा तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन परिसरात फिरणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनचालकांना दंड ठोठावण्यात येत आहे. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम सुरु राहणार आहे.

दरम्यान, या भागातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून सुरु करण्यात आलेल्या मोहिमेचे स्वागत आहे. परंतु ही मोहीम राबवताना सामान्य पर्यटकांवर कायद्याचा दबाव पडणार नाही याकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ नागवेकर यांनी सांगितले. कळंगुटमध्ये कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस यंत्रणांकडून सुरु करण्यात आलेल्या मोहिमेचे स्थानिक पंचायत मंडळ स्वागत करीत असून या कामात पंचायत मंडळाचे पोलिसांना पूर्ण सहकार्य राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

SCROLL FOR NEXT