Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa: 'शेतीव्यवसायाला सरकारने प्राधान्य द्यावे'

आपण शेतकऱ्यासाठी सर्व शेतीविषयक योजना मोफत दिली जाईल अशी ग्वाही मगोचे नेते प्रवीण आर्लेकर (Praveen Arlekar) यांनी नागझर कासार्वारणे या भागातील शेतकऱ्या साठी मोफत अवजारे वितरीत केल्यानंतर ते बोलत होते.

दैनिक गोमन्तक

मोरजी: शेतकरी (Agriculture) शेतात काम करतो म्हणून आम्ही अन्न खावू शकतो, त्याच गरीब शेतकऱ्यासाठी सरकारच्या योजना मिळत नाही, शेतकरी आणि जनतेने आपल्याला सेवा करण्याची संधी दिली तर आपण शेतकऱ्यासाठी सर्व शेतीविषयक योजना मोफत दिली जाईल अशी ग्वाही मगोचे नेते प्रवीण आर्लेकर (Praveen Arlekar) यांनी नागझर कासार्वारणे या भागातील शेतकऱ्या साठी मोफत अवजारे वितरीत केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी मगोचे प्रवक्ते उमेश तळवणेकर (Umesh Talwanekar), माजी सरपंच संगीता गावकर, कोरगाव माजी सरपंच सुदीप कोरगावकर, रमाकांत तुळसकर, नरेश कोरगावकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, आवेलीन फर्नांडीस आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतीव्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी मगोतर्फे शेतकऱ्यांना मोफत अवजारे देण्याचा उपक्रम 19 रोजी राबवण्यात आला.

बाबू बिऱ्हाड आणणार?

साडेचार वर्षात उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy Chief Minister Babu Azgawkar) यांनी मतदाराना किती वेळ दिला आणि मडगावसाठी किती वेळ दिला हे विचारण्याची गरज आहे. निवडणुकीला सहामहीने असताना मडगाव येथून बाबू आजगावकर आपल्या मुला बाळासहित बिऱ्हाड पेडणेला आणणार असा दावा प्रवीण आर्लेकर यांनी करून बाबू ने मतदार संघातील शेतकऱ्यासाठी कोणत्याच योजना राबवल्या नाही. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना १० किलो बियाणे आणि दोन तीन किलो खत देवून शेतकऱ्याचा अवमान केला. मात्र यंदा शेतीसाठी त्यांनी काय दिले. किंवा साडेचार वर्षात शेतकऱ्यासाठी कोणत्या योजना राबवल्या असा सवाल प्रवीण आर्लेकर यांनी उपस्थित केला.

जय जवान, जय किसान

आमचे सरकार जय जवान जय किसान म्हणतात परंतु शेतकऱ्यावर अन्याय करताना सरकारला त्यांची आठवण येत नाही. परतू आता मगो पक्षाला पेडणे मतदार संघात तर जय किसान हा नारा १०० टक्के यशस्वी करायचा आहे. आज प्रविण आर्लेकर याना शेतकऱ्यांना अवजारे देवून चांगला उपक्रम राबवला. लॉकडावून काळात शेतकऱ्यांनी आपपल्या शेतात भाजीपाला पिकवला तोच भाजीपाला स्थानिकांनी खाल्ला, बाहेरचा भाजीपाला त्या काळात बंद होता, स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले योजना राबवल्या तर स्थानिक शेतकरी शेतीद्वारे क्रांती करू शकतात असे माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर यांनी सांगितले.

शेतकऱ्यासाठी चालना: आवेर्लीन

धारगळचे माजी पंच आवेलीन फर्नांडीस (Evelyn Fernandez) यांनी बोलताना प्रवीण आर्लेकर हे आमदार नसतानाही शेतकऱ्या साठी विविध योजना राबवतात, ते आमदार बनले तर शेतीद्वारे क्रांती होवू शकते. मागच्या साडेचार वर्षात बाबू आजगावकर यांनी शेतकऱ्यासाठी काहीच केले नाही परंतु राजेंद्र आर्लेकर यांनी शेतकऱ्यासाठी प्रोत्साहन दिले. असे सांगून शेतकऱ्यासाठी संपवण्यासाठी त्यांनी मोपा विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारचा दलाल बनून घश्यात घालून तो शेतकऱ्यांचा कैवारी नसून तो भाटकर झाल्याचा दावा आवेलीन यांनी केला.

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे भाजपात नसताना मोदी यांच्यावर टीका करत होते, काला धन लावूंगा आणि प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करणार. आले का १५ लाख तुमच्या खात्यात असा सवाल बाबू विरोधी पक्षात असताना करायचा आता बाबू आजगावकर भाजपात गेल्यावर त्यांच्या खात्यात किती कोटी आल्रे त्याची तपासणी करुया असे आवेलीन म्हणाले.

शेतकऱ्यांच्या गरजा ओळखणारा नेता: संगीता गावकर

वझरी माजी सरपंच संगीता गावकर यांनी बोलताना प्रवीण आर्लेकर हे सामान्य शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून काम करत आहे. गावागावातील स्थिती जाणून घेतो. आणि तो निर्णय घेतो. दीड वर्षापासून ते काम करत आहे. आगामी निवडणुकीत मगो पक्षाला विजयी करण्यासाठी गावागावात निर्धार केला जात असल्याचे सांगीतले.

यावेळी मगोचे प्रवक्ते उमेश तळवणेकर यांनी बोलताना सामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या प्रवीण आर्लेकर याना वाढता पाठींबा मिळत आहे. यापूर्वी निवडून आलेल्या आमदाराने २० वर्षाच्या कारकिर्दीत शेतकऱ्यासाठी काय केले असा सवाल उपस्थित करून केवल पक्ष आणि सरकारे बदलली ती 30 टक्के कमिशन खाण्यासाठी असा दावा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT