cashews & khawa  Dainik Gomantak
गोवा

Goa FDA Raid: सणासुदीच्या काळात मिठाई जपून खा! एफडीएकडून 3000 किलो निकृष्ट काजूसह 12 किलो खवा जप्त

FDA Raid: गोव्यात आजपासून (28 ऑक्टोबर) दिवाळीला सुरुवात झाली आहे. एकीकडे दिवाळीची लगबग सुरु असताना दुसरीकडे अन्न आणि औषध प्रशानसनाकडून धडक मोहीम राबवण्यात येत आहे.

Manish Jadhav

गोव्यात आजपासून (28 ऑक्टोबर) दिवाळीला सुरुवात झाली आहे. एकीकडे दिवाळीची लगबग सुरु असताना दुसरीकडे अन्न आणि औषध प्रशानसनाकडून धडक मोहीम राबवण्यात येत आहे. यातच, प्रशासनाने मोठी कारवाई केली. कळंगुटमधून प्रशासनाने तब्बल 3000 किलो निकृष्ट दर्जाचे काजू जप्त केले. एवढ्यावरच न थांबता प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील अविनाश पोवार यालाही शोधून काढले. अविनाश निकृष्ट दर्जाचे काजू पुरवठा करत होता. अन्न आणि औषध प्रशासनाच्या संचालिका श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रिचर्ड नोरोन्हा यांच्या टीमने ही कारवाई केली.

मडगावमध्ये धडक कारवाई

दरम्यान, कळंगुटमधील कारवाईनंतर अन्न आणि औषध प्रशसनाने मडगावमध्येही धडक कारवाई केली. विविध मिठाई आणि फरसाण उत्पादकांवर प्रशासनाने ही कारवाई केली. मडगाव KTC बसस्थानकावरुन FSSAI लेबल नसलेल्या 12 किलो खवा असलेल्या दोन बॅगा जप्त केल्या, ज्याची अंदाजे किंमत 3, 8400 असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, FSSAI लेबल नसलेला 16 किलो आग्रा पेठाचे 2 बॉक्स तसेच, 30 किलो बॉम्बे हलव्याचे 2 बॉक्सही जप्त करण्यात आले.

कळंगुटमधील तीन दुकानांवर कारवाई

दोन दिवसांपूर्वी, अन्न आणि औषध प्रशासनाने कळंगुटमध्ये समुद्रकिनारी असलेल्या काजूच्या तीन दुकानावर ही कारवाई केली होती. FSSAI परवान्याशिवाय ही दुकाने सुरु होती. प्रशासनाने कारवाई करत तात्काळ दुकाने बंद करण्याचे आदेश मालकांना दिले. हद्द म्हणजे, या तीनही दुकानात निकृष्ट दर्जाचे काजू मिसळून विकले जात होते. ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचे प्रशासनाला आढळून आले. 1 लाख किमतीचा साठाही नष्ट करण्यात आला. याशिवाय, कळंगुट सर्कलजवळील एका दुकानातून ई-सिगारेट आणि विदेशी सिगारेटही प्रशासनाने जप्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'पूजा नाईकच्या आरोपांना पुरावा मिळेना', DGP आलोक कुमार यांचा खुलासा; प्रकरणाचा तपास थंडावणार?

अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

DLF Housing Project: 'दाबोळी टेकडीवरील एकाही झाडाला हात लावू नका', कोर्टाची 'डीएलएफ'ला ताकीद

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेस 'झेडपी' निवडणुकीबाबत गंभीर आहे?

SCROLL FOR NEXT