मडगाव-कारवार (Madgaon- Karwar) हमरस्त्यावर माड्डीतळप येथे रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या गुरांना बगल देताना केळीची वाहतूक करणारे वाहन रस्त्याच्या कडेला पलटले. ही घटना आज दुपारी घडली. दावणगेरी- कर्नाटक येथून केए 28 डी 9920 हे वाहन मडगावला केळी घेऊन जात असताना रस्त्यावर असलेल्या भटक्या गुरांना बगल देताना निसरड्या रस्त्यावर हे वाहन पलटले. या वाहनाचे चालक व वाहक किरकोळ जखमी झाले आहेत मात्र वाहनाची नुकसानी झाली आहे.तीन दिवसांपूर्वी मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) चार पदरी बगल मार्गावर अज्ञात वाहनाने ठोकरल्याने तीन गुरे दगावली.
पोळे ते गुळे पर्यत मडगाव-कारवार हमरस्त्यावर बेवारस गुरांचा उपद्रव पावसाळ्यात जास्त सुरु झाला आहे.पोळे ते गुळे पर्यतच्या हमरस्त्यावर ठिकठिकाणी भटक्या गुरांचे ताफे रस्त्यावरच ठाण मांडून बसलेले असतात.त्याच्यामुळे रहदारीला त्रास होतोच मात्र रस्ते शेणाने भरल्याने निसरडे बनत आहेत त्यामुळे दुचाकीस्वार निसरून पडण्याच्या घटना घडत आहेत.माशे ते चाररस्ता पर्यतच्या मनोहर पर्रीकर बगल चारपदरी मार्ग या भटक्या गुरांच्या कचाट्यातून सुटला नाही.जलद व सुरक्षित वाहतूकीच्या दृष्टीने चारपदरी रस्त्याची बांधणी करण्यात येते.
करमल घाटात झाडे वाचवण्यासाठी भुयारी चार पदरी मार्ग काढण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे.जर या भटक्या गुरांनी भुयारी मार्गात पावसाळ्यात आसरा शोधल्यास ती सर्वाची डोकेदुखी ठरणार आहे.सद्या तळपण,गालजीबाग पूलाच्या कमानीखाली काही बेवारस गुरे आसरा घेत आहेत.पोळे ते गुळे हमरस्त्यावर शेळी,माड्डीतळप,दापट,माशे,पैंगीण बाजार ते वनविश्रामधाम,पर्तगाळ,अर्धफोंड,मोखर्ड,पालिका क्षेत्र,चाररस्ता व गुळे येथे गुरांचे कळप रस्त्यावरच ठाण मारून बसतात.
रात्रीच्यावेळी या रस्त्यावर ठाण मांडून बसलेली गुरे धोकादायक व अपघाताना आमंत्रण देणारी ठरतात.प्रत्येक पंचायतीने व पालिकेने अशा भटक्या गुराच्या बंदोबस्तासाठी कोंडवाडे बांधणे बंधन कारक आहे मात्र काणकोणातील सात पैकी कोणत्याही पंचायतीने व पालिकेने कोंडवाड्याची सोय केली नाही.पंचायतीने आर्थीक दृष्ट्या परवडणारे नसल्याचे बहुतेक सरपंचाचे मत आहे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.