गोवा (Goa) मुक्त होवून ६० वर्षे झाली आणि भारत स्वतंत्र होवून ७५ वर्षे झाली मात्र आज पर्यंत तेरेखोल गाव मुक्त झाला नाही. Dainik Gomantak
गोवा

Goa: तेरेखोल गाव गोवा सरकारला उपरेच, वीज पुरवठा महाराष्ट्राकडून

दैनिक गोमन्तक

मोरजी: गोवा (Goa) मुक्त होवून ६० वर्षे झाली आणि भारत स्वतंत्र होवून ७५ वर्षे झाली मात्र आज पर्यंत तेरेखोल गाव (Terekhol village) मुक्त झाला नाही. आजही ६० वर्षानंतरही या गावाला महाराष्ट्र सरकारकडून (Government of Maharashtra) वीज पुरवठा (Power supply) केला जातो, गावात एकालाही या ६० वर्षात गोवा सरकारने (Government of Goa) सरकारी नोकरी (Government job) सुशिक्षित युवकाला दिली नाही. गावात एकूण साडे तीनशे लोकवस्ती लोकसंख्या असून, १७० मतदार आहेत. एकूण साडे बारा लाख चौरमीटर जमीन आहे. ती सर्व जमीन लीडिंग हॉटेल प्रा. लिमिटेड कंपनीने चुकीच्या मार्गाचा अवलंब करून कुळ मुंडकार यांच्याही जमिनी विकत घेतल्या.

विजेसाठी तीन वर्षे आश्वासन

या गावात राज्यातून वीज पुरवठा करण्यासाठी मागच्या तीन वर्षापासून दरवर्षी वीज मंत्री निलेश काब्राल तेरेखोल वासीयाना भूमिगत पाण्यातून केबल घालून वीज पुरवठा करण्याचे आश्वासन देत असतात , त्याची आज पर्यंत पूर्तता न झाल्यामुळे स्थानिक पंच आग्नेलो फर्नांडीस यांनी नाराजी व्यक्त करून निदान आता तरी वीज पुरवठा करावा अशी मागणी केली आहे.

गावात कुणीच भाडेकरू नाही

या गावाचे खास विशीष्ट म्हणजे या गावात एकही भाडेकरू घरात कुणाच्याच नाही. सुरक्षतेच्या नजरेतून गावात एकी असून बाहेरच्याना भाडेकरू म्हणून कुणीही जागा किंवा घरात आसरा देत नाही.

गावात ना आरोग्य केंद्र ,ना शैक्षणिक सुविधा

गोवा मुक्तीची ६० वर्षे मोठ्या उत्साहात गोवा सरकार साजरी करत आहे. परतू आजही तेरेखोल गावाला आरोग्याची सेवा देणारे एकही केंद्र नाही. किंवा शिक्षणासाठी सोय नाही. त्याना महाराष्ट्र किंवा केरी हरमल या भागात शिक्षणासाठी यावे लागते. सरकारने आम्हाला छोटेखानी पूल बांधून देण्याची गरज होती ,मात्र त्याची पूर्तता झाली नाही , तारांकित हॉटेल व सुविधांची स्वप्ने आम्हाला दाखवण्यात आले ते अधांतरी आहे. संघटित होऊन आमचा लढा चालू आहे ,आमच्या जमिनी वाचवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत असे पंच आग्नेल फर्नांडिस यांनी सांगितले .

तेरेखोल गाव विकण्यास जबाबदार कोण ?

मांद्रे मतदार संघातील तेरेखोल नदीच्या पलीकडे असलेल्या तेरेखोल गावातील तब्बल साडे बारा लाख चौरस मीटर जागा स्थानिकांच्या घरासहित पूर्ण गाव विकण्यास जबाबदार कोण ? राज्यकर्त्यांच्या सहकार्याशिवाय हा गाव विकलाच जावू शकत नव्हता , पैसा फेको तमाशा देखो ,याची अंमलबजावणी करत एका रात्रीत आणि एका वातीत मंदिर उभारून देण्यासाठी भक्तगण देवाला फसवतात त्याच प्रमाणे दिल्लीच्या हॉटेल कंपनीने या जमनिचा व्यवहार करताना कुळ मुंडकार याना फसवले.

तेरेखोल गाव हा केरी पंचायतीचा एक प्रभाग आहे , तेरेखोल नदी पलीकडे असल्याने त्याचा संबध गोव्याशी तुटलेला असला तरी हा गोव्याच भाग आहे . आज गोवा आपला ६० वर्षाचा मुक्त दिन साजरा करत असताना आजही या गावाला राज्यातून वीज पाणी आरोग्य , शिक्षण या मुलभूत सेवा सुविधा उपलब्ध होत आही , पाणी विभागाने तेरेखोल गावात विहिरीला पंप बसवून पाणी पुरवठा करते . हा परिसर हरित परिसर एकूण साडे बारा लाख चौरस मीटर जागेत हा गाव व्यापलेला आहे , याच गावांत सावंत भोसले नी उभारलेला ऐतिहासिक तेरेखोल किल्ला आहे . आणि हा किल्ला भाजपा सरकारने एका हॉटेल मालकाला लीजवर चालवायला दिला . किल्ल्याचे हॉटेलात रुपांतर केले .

याच किल्ल्या सभोवतालची जमीन सोडून दिल्ल्हीतील लीडिंग हॉटेल कंपनीने पूर्ण साडे बारा लाख चौरस मीटर जागा घरासहित विकत घेतील आता पूर्ण गाव लीडिंग हॉटेलच्या ताब्यात आहे. हि कंपनीच आता डबघाईस आल्याने हि जमीनच आता विकायला काढली आहे .

कुळाची जमीन विकता येत नाही ?

कुळाची जमीन विकता येत नाही , मात्र कायद्याच्या पळवाटातून कुळाना फसवून काही कुळाकडून न्यायालयात आपले नाव चुकीने लागले ते डिलीट करावे असे अर्ज सादर करून जमिनी घेतल्या .

तारांकित हॉटेल दिवा स्वप्न

सुरुवातीला लीडिंग हॉटेलचे अधिकारी श्री गांगुली यांनी स्थानिक पत्रकाराना माहिती देताना या जागेत भव्य तारांकित हॉटेल , शैक्षणिक संस्था , सर्व प्रकारच्या सोयी असलेले खास व्हिलेज नर्माण केली जाईल गावासाठी भव्य सभाग्रह ,क्रीडा मैदान , चोवीस तास मोफत पाणी व वीज गावासाठी देण्याची ग्वाही दिली होती . शिवाय गोल्फ कोर्स उभारण्यात येईल असे स्थानिक पत्रकाराना श्री . गांगुली यांनी सांगितले होते . शिवाय तेरेखोल नदीवर कंपनी सर्व खर्च करून आकर्षित पूल उभारणार होती , आणि हा पुलाच पाहण्यासाठी लाखो पर्यटक येतील असा विश्वास त्यांनी दिला होता . तारांकित हॉटेल आणि सुविधांचे दिवा स्वप्न दाखवले होते ते आताही स्वप्नच राहिले .

गोवा मुक्त होवून ६० वर्षे झाली . मात्र आज पर्यंत तेरेखोल गावातील समस्या आमदार मंत्र्याला आणि सरकारलाही सोडवता आले नाही . पूर्ण गावातील जमिनी विकत असताना कोणत्याही राजकीय नेत्यांनी विरोध केला नाही , मात्र स्थानिक कुळ मुंडकार यांनी उठाव केला मात्र पैशाच्या बळावर आणि कायद्याच्या पळवाटातून त्यांचा टिकाव लागला नाही . पूर्ण तेरेखोल विकण्यासाठी राजकीय नेत्यांचा पूर्ण हात आहे .

या मतदार संघातून भाऊसाहेब बांदोडकर आणि प्रा. लक्ष्मिकान्त पार्सेकर हे निवडून येवून मुख्यमंत्री झाले . त्यानंतर देसौझा मंत्री झाले , रमाकांत खलप उपमुख्यमंत्री , संगीता परब शिक्षणमंत्री झाल्या . आमदार दयानंद सोपटे हे गोवा पर्यटन विकास महामंडळ चेरमेन बनले . मात्र या नेत्यांनी तेरेखोल विकत असताना कधीच रस्त्यावर येवून आवाज उठवला नाही , जमीन विकणारे मधस्ती करणाऱ्याना करोडोंची माया मिळाली . आपल्या डोळ्या देखत पूर्ण गाव विकत जाताना कोणीही राजकार्त्ये रस्त्यावर आले नाही , मात्र बिगर संस्था , सामाजिक कार्यकर्त्यांनी तेरेखोलवासीयाना पाठींबा दिला .

तेरेखोल गाव हा कॉंग्रेस सरकारच्या काळात विकला गेला , त्यावेळी दिगंबर कामत हे मुख्यमंत्री होते . लीडिंग कंपनीने सरकारकडे आणि त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले मनोहर पर्रीकर यांच्याकडे चर्चा केली कंपनीला सरकारने आणि विरोधी पक्षानेही मोठा पाठींबा दिला होता .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT