Uddhav Thackeray in Kolhapur: I am not a CM that will only give package
Uddhav Thackeray in Kolhapur: I am not a CM that will only give packageDainik Gomantak

मी पॅकेज देणारा मुख्यमंत्री नाही: उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आज पूरग्रस्त कोल्हापूर (Maharashtra Flood) भागाची पाहणी करण्यासाठी गेले होते

मी फक्त पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री(Chief Minister ) नसून लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आलो आहे. असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी आज कोल्हापूर(Kolhapur Flood) दौऱ्यात केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूरग्रस्त कोल्हापूर (Maharashtra Flood) भागाची पाहणी करण्यासाठी गेले होते त्यांनी या भागाचा पूर्ण आढावा घेऊन एक पत्रकार परिषद घेऊन लोकांना नक्की मदत करेल असे सांगितले आहे.

तसेच पश्चिम महाराष्ट्रात सतत होणरा जास्तीचा पाऊस आणि पुराचा धोका लक्षात घेता या सगळ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा, पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू,असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहे. त्याचबरोबर पूरग्रस्त भागाची पाहणी करत असून याबाबत जिल्हास्तरावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योग्य निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्प्ष्ट केले आहे.

मागच्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले होते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तर पुराने मोठया प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या साऱ्या भागाची पाहणी करत आहेत. तुम्ही चिंता करू नका सर्वांना मदत मिळेल असे आश्वासन त्यांनी आपल्या दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधताना दिले आहे.तसेच मदत देताना कुठलीही तांत्रिक अडचण येणार नाही पंचनामे झाल्यांनतर सर्वांना सरसकट मदत दिली जाईल असे वचनही उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com