Mayem Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : ‘माले’ पेटले...देवीचा ‘पण’ही पूर्ण; मयेत ‘माल्याची’जत्रा उत्साहात

Bicholim News : भाविकांची अलोट गर्दी; माल्याच्या जत्रेच्या तोंडावर ही जत्रा रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला होता. त्यातच ''पेठ''च्या पूर्वापार परंपरेत खंड पडला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, तब्बल चार वर्षांनंतर मयेवासियांसह तमाम भाविकांचे लक्ष लागून राहिलेल्या मये येथील श्री माया केळबाई पंचायतन देवस्थानची प्रसिद्ध ''माल्या''ची जत्रा अखेर उत्साहात साजरी झाली. जत्रा सुरळीतपणे साजरी झाल्याने 'माले' पेटले आणि देवीचा 'पण' ही पूर्ण झाला.

मंगळवारी सुरु झालेल्या या जत्रेची बुधवारी पहाटे हजारो भक्तगणांच्या साक्षीत परंपरेप्रमाणे कोणत्याही विघ्नाशिवाय उत्साहात सांगता झाली.

मान आणि अधिकाराच्या मुद्यावरुन गेल्या काही वर्षांपासून या देवस्थानचे प्रमुख उत्सव वादाच्या विळख्यात अडकले आहेत. यंदा तर देवस्थानचा कळसोत्सव सुरवातीलाच रद्द करण्याची वेळ आली होती. त्यामुळे ''माल्या''च्या जत्रेविषयी अनिश्चितता निर्माण झाली होती.

माल्याच्या जत्रेच्या तोंडावर ही जत्रा रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला होता. त्यातच ''पेठ''च्या पूर्वापार परंपरेत खंड पडला होता.

त्यामुळे जत्रेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र ही जत्रा अखेर एकदाची साजरी झाली. पोलिस बंदोबस्तही यावेळी तैनात होता. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.या जत्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

...अन् देवीची 'पण'पूर्ती

परंपरेप्रमाणे मध्यरात्री मुळगावचे धोंड आणि इतर भक्तगण मये गावात आले. अन्य मानकरी येताच 'पेठ' मुळगावला जाण्यासाठी मार्गस्थ झाली. दरम्यान केळबाई देवीची 'पेठ' महामाया मंदिरापाशी नेण्यात आली. पहाटे 'माले' प्रज्वलित करून मोडाच्या डोक्यावर ठेवण्यात आल्यानंतर अवसारासह 'माले' नृत्याचा थरार सुरु झाला. त्यामुळे श्री केळबाई देवीचा ''पण'' ही पूर्ण झाला. ''माले''उत्सव झाल्यानंतर परंपरेप्रमाणे या जत्रोत्सवाची सांगता झाली.

पोलिस बंदोबस्त

जत्रेवेळी कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही जत्रेत सहभाग घेतला होता.

'पेठ' परंपरेत खंड, तरीही...

मुळगाव येथून देवीची पेठ मये येथील श्री केळबाई देवीच्या मंदिरात आल्यानंतर पारंपरिक विधी करण्यात येतात. त्यानंतर मयेतील देवीची पेठ मिळून दोन्ही पेठ चव्हाटा या स्थानी नेण्याची परंपरा आहे.

गेल्या रविवारी पहाटे मुळगाव येथील देवीची पेठ मयेत आली होती. मात्र मंदिरात न जाता प्रवेशद्वारावरूनच परस्पर चव्हाटा या स्थानी गेली होती. त्यानंतर नाईक गटातील लोकांनी कौल घेऊन श्री केळबाई देवीची पेठ चव्हाटा या ठिकाणी नेऊन स्थानापन्न केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गोव्याकडून शिका", OLAच्या ढिसाळ कारभारावर कुणाल कामरा भडकला! 'विक्री थांबवा' मागणीला समर्थन; Post Viral

Sambar History: आमसुलं न्हवती म्हणून चिंच वापरली, छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ दिले नाव; 'सांबारचा' रंजक इतिहास

Women's World Cup 2025: कोणाला मिळणार फायनलचे तिकीट? 'या' 4 संघांमध्ये रणसंग्राम, उपांत्य फेरीचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!

Goa Politics: गोमंतकीयांना 'सत्तापरिवर्तन' हवेच आहे, त्यासाठी महाआघाडी होणे अपरिहार्य..

Vagheri: हजारो फुलपाखरांचे आश्रयस्थान, वृक्षांनी समृद्ध 'वाघेरी डोंगर'

SCROLL FOR NEXT